HomeArchiveदर्जेदार शिक्षणाकरिता 'यपमास्टर'!

दर्जेदार शिक्षणाकरिता ‘यपमास्टर’!

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
“डिजिटल क्षिक्षण क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या यप टीव्हीने देशात दर्जेदार शिक्षणाच्या लोकशाहीकरणासाठी ‘यपमास्टर’ हा नवा एडटेक मंच लाँच केला आहे. या मंचावर दर्जेदार तंत्रज्ञान सुविधा, विविध विषयांचे तज्ज्ञ शिक्षक, लाइव्ह इंटरॅक्टिव्ह क्लासेस उपलब्ध आहेत. तसेच सध्या देशातील आआयटी-जेईई आणि एनआयआयटी इच्छुकांसाठी हा सर्वात किफायतशीर प्लॅटफॉर्म आहे. विशेष म्हणजे मध्य पूर्वेतही या मंचाची सुविधा उपलब्ध आहे.”
 
“यपमास्टरवर ११ वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांना आयआयटी जेईई आणि एनआयआयटी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तसेच ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी फाऊंडेशन कोर्सदेखील उपलब्ध आहेत. कोव्हीड-१९ च्या लॉकडाउनमुळे या एडटेक प्लॅटफॉर्मवर सध्या १२वीतील जे विद्यार्थी आयआयटी-जेईई/एनआयआयटीसाठी इच्छुक आहेत, त्यांना मोफत शिकवण्या सुरू आहेत.”
 
“यपमास्टरच्या वैयक्तिक कोर्सेसमध्ये ३ ते ६ तास दररोज लाइव्ह क्लास असून त्याचवेळेला लाइव्ह चॅटद्वारे विद्यार्थी त्यांच्या मनातील शंका विचारू शकतात. लाइव्ह क्लासेस हे कधीही, कुठेही आणि कोणत्याही उपकरणावर उदा. वेब, मोबाइल, टॅबलेट किंवा स्मार्ट टीव्हीवर पाहता येतात. यावर निवडक स्टडी मटेरिअल, कॉम्प्रहेन्सिव्ह टेस्ट, ग्रेडिंग मोड्यूल्स असून हे मंचावरील शीर्ष शिक्षकांकडून तयार करण्यात आले आहेत.”
 
“विद्यार्थ्यांचे शिक्षण पद्धतशीर व्हावे, यासाठी २४ तास शंका निरसनाची सुविधा असेल.”

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content