HomeArchiveतिवरे धरण दुर्घटनेतील...

तिवरे धरण दुर्घटनेतील कुटुंबांचे रविंद्र वायकर यांनी केले सांत्वन

Details
तिवरे धरण दुर्घटनेतील कुटुंबांचे रविंद्र वायकर यांनी केले सांत्वन

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी तिवरे गावातील उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबियांची मंगळवारी पुन्हा भेट घेतली, तसेच त्यांच्या पुनर्वसनासाठी ग्रामस्थांबरोबर एका बैठकीद्वारे चर्चाही केली. पालकमंत्र्यांनी पीडित कुटुंबियांना त्याचठिकाणी घरे बांधून पुनर्वसन करून देण्याचा मनोदय व्यक्त केला. दुर्घटनाग्रस्तांची दुसरीकडे पुनर्वसन करण्याची इच्छा असेल तर तसे करू शकतो. परंतु त्यास थोडा जास्त कालावधी लागण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

ग्रामस्थांची जमीन, शेती सर्व काही इथेच असल्यामुळे गावातच त्वरित पुनर्वसन करणे शक्य होईल. पुनर्वसन करताना निधी कमी पडू दिला जाणार नाही. पुनर्वसन करताना दुर्घटनाग्रस्तांना चांगल्या दर्जाची मुलभूत सोयी-सुविधा असलेली घरे बांधून देण्यात येतील. या दुर्घटनेत उद्धस्त झालेले साकव, पूल, मुख्य रस्ता व अंतर्गत रस्ते, कूपनलिका, पथदिवे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या सर्वांची नव्याने बांधणी व दुरूस्ती तत्काळ करणे गरजेचे असून आजुबाजूच्या गावांशी तुटलेला संपर्क सुरळीत करण्याकरिता रस्ते लवकरात लवकर बनवण्यात येतील. तुटलेल्या विजेचे खांब पुन्हा नव्याने उभारून त्यावरून विजेचे कनेक्शनही तत्काळ देण्यात येतील. ज्यांची गुरेढोरे वाहून गेली असतील त्यांना ती देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. पुनर्वसन व अन्य समस्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक लवकरच आयोजित करण्यात येईल, सं आश्वासन त्यांनी दिलं.

दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना ५०० चौरस फुटांचे घर मिळवून द्यावे अशी त्यांची मागणीही वायकर यांनी मान्य केली. बेघर झालेल्या दुर्घटनाग्रस्तांना त्वरित तात्पुरती शेड उभारून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देशही त्यांनी दिले. धरण फुटून वाहून गेलेल्या एका कुटुंबातील रूद्र नावाच्या छोट्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च वयाची १८ वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून करण्याचे वचन त्यांनी दिले. तिच्या नावे रक्कम बँकेत ठेऊन त्यावर येणाऱ्या व्याजातून तिच्या शिक्षणाचा खर्च भागवला जाईल. याठिकाणी नव्याने पाण्याची पाईपलाईन टाकण्याकरीता सुमारे सव्वा कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव मांडला जाईल असेही वायकर म्हणाले.
 
या दुर्घटनेत आपले सर्वस्व गमावलेल्या कुटुंबाना आधार देण्याबरोबर कुटूंब पुन्हा उभे करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री वायकर यांनी १९ जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तत्पूर्वीच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत पुनर्वसन कार्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुनर्वसनाचा तसेच मदतकार्याचा आढावा घेतला. या बैठकीला रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम, तालुकाप्रमुख प्रतापराव शिंदे, विविध विभागांचे अधिकारी, तिवरे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content