HomeArchiveतामिळनाडू आणि केरळ...

तामिळनाडू आणि केरळ किनाऱ्यांना चक्रीवादळाचा इशारा

Details

 
 
“केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
चक्रीवादळाचा इशारा देणाऱ्या भारतीय हवामान खात्याच्या विभागाच्या म्हणण्यानुसार, बंगालच्या उपसागराच्या आग्नेय दिशेला असलेला कमी दाबाचा पट्टा आता तीव्र स्वरूपाचा झाला असून तो 1 डिसेंबरला पहाटेसाडेपाचच्या सुमारास नैऋत्य दिशेकडील भागात सरकला आहे. सकाळी साडेआठच्या सुमाराला तो श्रीलंकेतील त्रिंकोमालीच्या पूर्व-आग्नेय दिशेला 500 किमीवर आणि कन्याकुमारीपासून पूर्व-आग्नेय दिशेला 900 किमीवर स्थिरावला होता.
 
येत्या चोवीस तासांत हे चक्रीवादळ तीव्र होण्याची दाट शक्यता आहे. ते पश्चिम-वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे, 2 तारखेच्या संध्याकाळपर्यंत ते त्रिंकोमालीजवळून पुढे जाईल. त्यानंतर 3 डिसेंबरच्या सकाळी ते आणखी पश्चिमेकडे प्रवास करून, मन्नारच्या आखातात आणि लगतच्या कोमोरीन भागात पोहोचेल आणि तामिळनाडूच्या किनारी भागाकडे सरकत जाईल.
 
त्यामुळे तामिळनाडूच्या दक्षिण भागात 2 आणि 3 डिसेंबरला, केरळच्या दक्षिण भागात 2, 3 आणि 4 डिसेंबरला काही ठिकाणी तीव्र ते अतितीव्र स्वरूपाचा पाऊस पडेल, तर या काळात तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडेल अशी दाट शक्यता आहे. 2 आणि 3 डिसेंबरला उत्तर तामिळनाडू, पुदुचेरी, माहे आणि करियाकल भागात तसेच केरळच्या उत्तर भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे, या भागात 4 तारखेला तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. आंध्र प्रदेशाच्या दक्षिण किनारपट्टीच्या भागात तुरळक ठिकाणी येत्या 2 आणि 3 तारखेला तर लक्षद्वीप परिसरात 3 आणि 4 तारखेला मुसळधार पाऊस पडेल.
 
सध्या खवळलेला समुद्र बंगालच्या उपसागराच्या आग्नेय दिशेकडील भागात आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीवर आणि लगतच्या भागात भाग तीव्र ते अतितीव्र स्वरुपात खवळलेला राहील. 2 आणि 4 डिसेंबरला कोमोरीन परिसर, मन्नारचे आखात, तामिळनाडू आणि केरळच्या दक्षिण किनारपट्ट्या आणि लगतच्या भागात समुद्र तीव्र ते अतितीव्र स्वरुपात खवळलेला राहील. 1 ते 4 डिसेंबर या काळात मासेमारीचे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या सर्व मच्छिमारांना आजच्या आज किनाऱ्यावर परत येण्यास सांगण्यात आले आहे. हवामानसंदर्भातील सर्व घडामोडींवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून वादळाचा धोका असणाऱ्या राज्यांशी नियमितपणे संपर्क साधून माहिती देण्यात येत आहे.
 “

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content