HomeArchive‘डिलिव्हरी’ देणार १५,०००...

‘डिलिव्हरी’ देणार १५,००० हंगामी नोकऱ्या!

Details
  

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
“भारतातील अग्रणी पुरवठा साखळीसेवा प्रदाता डिलिव्हरी, ही कंपनी येत्या सणासुदीच्या काळात ६५ ते ७५ दशलक्ष पॅकेज पोहोचवण्यासाठी सज्ज आहे. हे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास १०० टक्के आहे. सणासुदीच्या काळात, पुढील काही आठवड्यात १५,००० हंगामी नियुक्त्या करण्याचे डिलिव्हरीचे उद्दिष्ट आहे. सुरक्षारक्षक, ड्रायव्हर्स, पिकअप, हब, सर्व्हिस सेंटर अशा नियुक्त्या केल्या जातील.”
 
“यासोबतच, कंपनी तिचे विविध भागीदारी कार्यक्रम, ऑन-बोर्डिंग वैयक्तिक दुचाकीस्वार, ट्रान्सपोर्टर्स, स्थानिक किराणा आणि व्यावसायिकांच्या माध्यमातून शेवटच्या मैलापर्यंत माल पोहोचवण्याची क्षमता वाढवत आहे. भारतभरात २५,०००पेक्षा जास्त पार्टनर साइन-अप्स वाढवण्याची कंपनीची योजना आहे, जी सध्याच्या बेसपेक्षा दुप्पट आहे. या हंगामातील लास्ट माइल पार्टनर्सना १०० कोटींपेक्षा जास्त महसूल भरणा कंपनीने दिला. १२,०००पेक्षा जास्त व्यवसाय आणि व्यक्तींनी आधीच डिलिव्हरीशी भागीदारी केलेली आहे.”
  

 
“डिलिव्हरीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य व्यवसाय अधिकारी संदीप बारसिया म्हणाले की, ‘आम्ही जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी सतत महत्त्वपूर्ण गुंतवणूक करत आहोत. एकूणच, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बिलासपूर, भिवंडी आणि बंगलोरमध्ये मेगा ट्रकिंग टर्मिनल सुरू करण्यासह मागील वर्षभरात आमचे फिजिकल फुटप्रिंट १२ दशलक्ष चौरस फुटांवर गेला आहे. आमच्या मूळ योजनेच्या अनुषंगाने आम्ही पुढील १८ ते २४ महिन्यांमध्ये विस्तारण्यासाठी ३०० कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक करणार आहोत. याद्वारे आमची साधने वाढवू तसेच आणखी मेगा ट्रकिंग टर्मिनल्स वाढवू.””

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content