HomeArchiveठाण्यात राज्यस्तरीय ब्रीज...

ठाण्यात राज्यस्तरीय ब्रीज स्पर्धा

Details

 

 
केएचएल न्यूज ब्युरो

 
“सीकेपी सोशल क्लब, सीकेपी ज्ञाती समाज व ठाणे जिल्हा ब्रीज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ब्रीज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. २० ऑक्टोबर २०१९ रोजी सीकेपी हॉल, खारकर आळी, ठाणे येथे होणार आहे. सदर स्पर्धा टीम ऑफ फॉर तसेच पेअर्स पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन ठाणे जिल्हा ब्रीज असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. म्हसकर यांच्या हस्ते होणार आहे.”
 
 
“या स्पर्धा सीकेपी हॉल, ठाणे येथे नियमित होत होत्या. मात्र सीकेपी हॉलचे नूतनीकरण तसेच अन्य काही अपरिहार्य कारणांमुळे घेता आल्या नाहीत. परंतु आता नूतनीकरण झालेल्या हॉलमध्ये या स्पर्धा संपन्न होणार आहेत. या स्पर्धेत मुंबई, पुणे, सोलापूर, नाशिक येथील संघ सहभागी होणार आहेत.”
 
 
“एशियाड ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करून कांस्यपदक पटकावणारे राजू तोलानी व अजय खरे यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडू व प्रतिनिधींच्या चहा, नाश्ता व भोजनाचीही व्यवस्था केली आहे. अधिक माहितीसाठी अनिरूद्ध संझगिरी – ९८१९२६७४५७ तसेच दक्षिणदास – ९००४०२२०८२ तसेच सीकेपी क्लबचे उदय राजे – ९८१९१५०८६४ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.”

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content