HomeArchiveठाण्यात मामा वैद्य...

ठाण्यात मामा वैद्य राज्यस्तरीय ब्रीज स्पर्धा

Details

“सालाबादप्रमाणे ठाणे जिल्हा ब्रीज असोसिएशन व आर्य क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ब्रीज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २८ व २९ डिसेंबर २०१९ रोजी आर्य क्रीडा मंडळ, ठाणे येथे ही स्पर्धा होणार आहे. सदर स्पर्धा टीम ऑफ फोर तसेच पेअर्स पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेत ठाणे, मुंबई, नाशिक, रत्नागिरी, सोलापूर, सांगली जिल्ह्यातील संघ तसेच आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.”

 
“स्पर्धेचे उद्घाटन शनिवार दि. २८ डिसेंबर रोजी दुपारी आर्य क्रीडा मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र रणदिवे यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडू व प्रतिनिधींच्या चहा, नाश्ता व भोजनाचीही आयोजकांतर्फे व्यवस्था केली आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला जिल्हा ब्रीज असोसिएशन तर्फे मामा वैद्य चषक व रोख पारितोषिक तर विजेत्या पेअरला मोहन गुप्ते चषक व रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेत अधिकाधिक खेळाडू व संघांनी सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.”
 
 
स्पर्धेचे डायरेक्टर म्हणून सुकृत विजयकर तर राज्य प्रतिनिधी म्हणून हेमंत पांडे काम पाहणार आहेत. अधिक माहितीसाठी अनिरूद्ध संझगिरी ९८१९२६७४५७ तसेच दक्षिणदास ९००४०२२०८२ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content