HomeArchiveट्रेलचे नवे अँथम...

ट्रेलचे नवे अँथम गीत लॉन्च!

Details
  

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
“भारतातील वेगाने विकसित होणाऱ्या लाइफस्टाइल कम्युनिटी मंच ट्रेलने मनात सुरू असलेल्या भावना व्यक्त करण्याला प्रोत्साहन देण्याकरिता नवे अँथम गीत लाँच केले आहे. ‘कह जो कहना है’ असे शीर्षक असलेले हे गीत आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रख्यात पार्श्वगायक सुखविंदर सिंह यांनी गायलेले असून कथा सांगण्याची कला साजरी करण्यासाठी तयार करण्यात आले आहे आणि आता ते लोकांना मनापासून बोलण्यासाठी प्रोत्साहित करते. प्रत्येकाची वेगळी कहाणी असते, त्यामुळे कुणीही आपले मत आपल्यापर्यंतच मर्यादित ठेवू नये, असा संदेश यातून मिळतो. हे गीत लाँच झाल्यानंतर युट्यूबवर १.५ दशलक्षांपेक्षा जास्त वेळा पाहिले गेले आहे. गाणे लाँच करणारे ट्रेल हे भारतातील पहिले स्टार्टअप बनले आहे.”
 
“ट्रेल हे भाषासंबंधी बंधने झुगारुन देण्यासाठी लोकांना सक्षम करण्यास कटिबद्ध आहे. त्याअनुशंगाने हे गीत लोकांना स्वत:च्या अनोख्या कहाण्या, विचार आणि मते कोणत्याही अडथळ्याविना शेअर करत एक समाजाच्या रुपात एकत्र येण्याचा आग्रह करते. यात ट्रेलच्या प्लॅटफॉर्मवर कंटेंट बनवणाऱ्यांना दाखवण्यात आले आहे. या गाण्याचे बोल त्यांच्या भावना व्यक्त करतात. जे लोक आपल्या कथा इतरांसोबत शेअर करु इच्छितात, त्या सर्व लोकांसाठी हे गाणे समर्पित आहे.”
 
“सुखविंदर सिंह म्हणाले की, “संगीत आणि इतर मार्गांद्वारे प्रत्येक क्षेत्रात आपली कला आणि कौशल्य दाखवण्याची संधी देणाऱ्या अॅप्समध्ये ट्रेल हे एक विशेष अॅप आहे. जगभरातील विविध विषयांवर निडरतेने आणि स्वतंत्रपणे बोलण्यासाठी एक मंच याद्वारे उपलब्ध करून दिला आहे. मला वास्तविकत: हा दृष्टीकोन खूप आवडतो. लोकांना आपले सुप्त गुण दर्शवण्यासाठी हा मंच अनेक प्रकारे प्रेरित करतो.””
 
“ट्रेलचे सहसंस्थापक पुलकित अग्रवाल म्हणाले की, ‘हे गीत लोकांनी प्रगती करणे, आपले सर्जनशील विचार, भावना, मत कोणत्याही न्यूनगंडाशिवाय शेअर करण्यास प्रेरित करण्यासाठी बनवण्यात आले आहे. त्यामुळेच त्याला ‘कह जो कहना है’ असे नाव देण्यात आले आहे. आमच्या युझर्समध्ये तर ते आधीच लोकप्रिय ठरले आहे. आम्हाला विश्वास आहे की, जास्तीतजास्त लोकांच्या विचारांना आवाज देणे आणि एक समाज म्हणून एकत्र येण्यासाठी हे गाणे प्रेरित करेल.””

Continue reading

हॉलिवूड नगरीत मराठी अस्मितेचा झंझावात! ‘नाफा’ चित्रपट महोत्सवाला तुफानी प्रतिसाद!!

महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने गेल्या आठवड्यात अमेरिकेत सॅन होजे येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन (नाफा) मराठी फिल्म फेस्टिव्हल २०२६चा तीन दिवसांचा दिमाखदार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अमेरिकेतील भारतीय आणि मराठी रसिकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे संपूर्ण महोत्सवाला...

ओडिसी नृत्यगुरु शुभदा वराडकर राष्ट्रीय स्तरावर सन्मानित

मुंबईतल्या बोरीवलीमधल्या अभिनव नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या ओडिसी नृत्याच्या समर्पित कलासाधिका गुरु शुभदा वराडकर यांच्या कलासाधनेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीमार्फत दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य व पारंपारिक कलांच्या विविध क्षेत्रातील कलाकारांना प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान...

कीर्तिकरांच्या पुढाकाराने शरीरसौष्ठवाला नवी ताकद; ५ संघटना एकवटल्या!

अनेक वर्षे फुटीच्या विळख्यात अडकलेल्या मुंबईच्या शरीरसौष्ठवाला अखेर एकीचे दमदार बळ मिळाले आहे. विखुरलेली ताकद, तुकड्यांत विभागलेली संघटना आणि त्यामुळे मागे पडलेले खेळाडू या सर्वांना आता एकजुटीचा ताकद मिळाली आहे. शरीरसौष्ठव खेळाचे आधारस्तंभ, माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पुढाकाराने...
Skip to content