HomeArchiveटेबल टेनिस स्पर्धेत...

टेबल टेनिस स्पर्धेत हिरानंदानी शाळेला रौप्यपदक!

Details

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
“राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत ठाण्यातील हिरानंदानी फाऊंडेशन शाळेच्या संघाने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात रौप्यपदक पटकावले. ख्याती पांडे, प्रियांका गुप्ते व सायली प्रधान यांनी या संघाचे प्रतिनिधीत्व केले.”
 

वैयक्तिक गटात १७ वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेत ठाण्याच्या सरस्वती विद्यामंदीरच्या श्रावणी सावंतने ७ पैकी ६ सामने जिंकून निर्विवाद वर्चस्व गाजवले. या कामगिरीच्या जोरावर श्रावणी सावंत बडोदा येथे ०५ ते ०९ जानेवारी २०२० दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी १७ वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदाची मानकरी ठरली आहे. या खेळाडूंना पिनॅकल क्लबचे समीर सारळकर व प्रदीप मोकाशी यांचे मार्गदर्शन लाभले.
 
 
 
 
 
“परभणी येथे १२ ते १५ डिसेंबरदरम्यान क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी परभणी व परभणी जिल्हा टे. टे. असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी येथील क्रीडा संकुलात राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धा २०१९-२० चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन उज्वला राठोड, अध्यक्षा, जिल्हा परिषद, परभणी यांच्या हस्ते, परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाले.”

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content