HomeArchiveघराणेशाहीचे जू कार्यकर्त्यांच्या...

घराणेशाहीचे जू कार्यकर्त्यांच्या मानेवर!

Details
घराणेशाहीचे जू कार्यकर्त्यांच्या मानेवर!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या माढा मतदारसंघातून माघार घेण्याविषयी बरीच उलटसुलट चर्चा झाली. कुणी तर पवार आम्हाला घाबरले अशीही पाठ थोपटून घेतली. घरातील बंडाचे नारे थोपवण्यासाठी पवारांना माघार घ्यावी लागली असाही एक सूर आहे. अजितदादा पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी मावळ मतदारसंघासाठी हट्ट धरला होता. तिकडे पवारांचा दुसरा नातू रोहित पवार विधानसभेसाठी पुणे जिल्ह्यात बांधणी करतो आहे. अशावेळी पार्थ अस्वस्थ होऊन त्याने थेट लोकसभा निवडणुकीसाठी दंड थोपटले. एकाच घरातील सर्व उमेदवार नकोत म्हणून पवारांनी विरोध करून पाहिला. पण बहुदा ते जमले नसावे किंवा लोकांना दाखवण्यापुरते असावे. काहीही असले तरी पवार रिंगणातून सध्यातरी बाहेर आणि पार्थ पवार रिंगणात अशा घडामोडी घडल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसने नवी दिल्लीहून उमेदवारांची जी पहिली यादी जाहीर केली आहे त्यात बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांचे नाव आहे पण, पार्थ पवार यांचे नाव नाही. रायगडसाठी सुनील तटकरे, साताऱ्यात उदयनराजे भोसले, उत्तर पूर्व मुंबईतून संजय दीना पाटील, ठाण्यासाठी आनंद परांजपे, कल्याणला बाबाजी बाळाराम पाटील, हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना पाठिंबा अशी त्यातील काही नावे आहेत. यात पार्थ आणि शरद पवार यांचेही नाव येते तर राजकीय घराणेशाहीचा आरोप त्यांना टाळता आला नसता. तसेही सुप्रियाताई आणि पार्थ वा शरद पवार या नावांनंतर आणि विधानसभेसाठी अजितदादांसह आणखी एक-दोन पवार यांची नावे जेव्हा येतात तो राष्ट्रवादीतील घराणेशाहीच्या घड्याळाचाच गजर असणार हे वेगळे सांगायची सुज्ञांना गरज नाही.

नेत्यांची मुले, नातवंडे जेव्हा परंपरागत राजगादी असल्यासारखी हक्काने आमदारकी, खासदारकीची वाट चालू लागतात तेव्हा पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते केवळ सतरंजी उचलत असतात. खासदारकी लढवण्यासाठी भाजपात प्रवेश करणाऱ्या सुजय विखे-पाटील यांनी तरी वेगळे काय केले? ती बंडखोरी अजिबात नाही तर घराणेशाहीच आहे. सुजय यांनी आजोबा बाळासाहेब विखे-पाटील यांचाच कित्ता तर गिरवला आहे. २०१४ च्या निवडणुकीनंतर भाजपाशी जवळीक करण्याचे संकेत देत याच विखे घराण्याने राधाकृष्ण विखे पाटील यांना विरोधी पक्ष नेते पद देण्यासाठी काँग्रेसवर दबाव आणला. सत्तेसाठी काँग्रेसकडून शिवसेना आणि पुन्हा काँग्रेस असा प्रवास करणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरातच कितीतरी सत्तापदे आहेत. महाराष्ट्रात राजकारणात विखे-पाटील यांनी घराणेशाही प्रथम आणली असे म्हटले जाते.

अर्थात मुले, मुली, पती, पत्नी, पुतणे, काका, भाऊ, वहिनी, सुना यांच्यासाठी या ना त्या मार्गाने घराणेशाहीच लादणारी राजकीय घराणी महाराष्ट्रात कितीतरी आहेत. आपल्याच राज्यात कशाला इतर राज्यांमध्येही याची ढळढळीत उदाहरणे आहेत. सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी जमेल तसे घराणेशाहीचे जू कार्यकर्त्यांच्या मानेवर ठेवले आहे. यातून कोणताही पक्ष सुटलेला नाही. काँग्रेस, भाजपा, शिवसेना, समाजवादी पार्टी अशा प्रत्येक पक्षांत राजकीय घराणेशाहीचे वारसदार आहेत. सत्तेसाठी काय वाट्टेल ते.. या उक्तीनुसार विद्यमान नेत्यांची मुले आणि नातेवाईक सत्तेसाठी प्रसंगी लांब उड्यांचा खेळ खेळत आहेत. पक्षांतर करत आहेत. ज्यांच्यावर दिवसरात्र टीका करण्याचे नाटक केले त्याच प्रतिस्पर्धी पक्षातील प्रमुखांसमोर लोटांगण घालत आहेत, नतमस्तक आहेत. पण उमेदवारी पदरात पाडून घेत आहेत. पक्षाशी निष्ठावान कार्यकर्त्यापेक्षा उमेदवारी देताना पैशाच्या थैल्या आणि घराण्याचा प्रभाव याचाच विचार करून नेत्यांच्या वारसदारांना लोकशाहीच्या सिंहासनावर बसवले जात आहे.

राहुल गांधी अखिल भारतीय कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले तेव्हा भाजपाने घराणेशाहीचा जोरदार गदारोळ केला होता. पण भाजपातही चित्र कुठे वेगळे आहे? ही लोकशाहीतील घराणेशाही जनतेने स्वीकारल्यासारखे भासते, कार्यकर्त्यांना स्वीकारावी लागते. कुठल्याही निवडणुका असोत, अगदी पंचायत समितीपासून जि.प. ते पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्था प्रत्येक निवडणुकीत आपल्याच कुटुंबातील वारसदारांना पुढे आणण्याची मातब्बर नेत्यांची पराकाष्ठा राहिली आहे. कुठल्याही नेत्याने मुलापेक्षा, नातेवाईकांपेक्षा कार्यकर्त्याला बळ दिले, उभे केले, निवडून आणले अशी उदाहरणे अत्यंत विरळा आहेत. सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, विश्वजित कदम, राजीव सातव, प्रतीक पाटील, प्रिया दत्त, मुकुल वासनिक, नीलेश राणे, राजीव राजळे, विजयसिंह मोहिते-पाटील, मनीष जैन, आनंद परांजपे, संजीव नाईक, संजय महाडिक, पूनम महाजन, हीना गावित, ठाण्यातील शिंदेशाही, मनसेची राजनीती अशी कितीतरी उदाहरणे घराणेशाहीचा उल्लेख करताच नजरेसमोर येतात. २०१४ च्या लोकसभेत प्रवेश करणारे १५६ खासदार हे घराणेशाहीचेच वारसदार होते. दुसऱ्याच्या मुलांचेही हट्ट पुरवतो, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच शरद पवार यांना मारला असला तरी शिवसेनाप्रमुखांनीही पुत्रहट्टच पुरवल्यामुळे राज ठाकरे यांना बाहेर पडावे लागले होते हे विसरता येणार नाही. सदोदीत, अहोरात्र जनतेच्या भल्याचाच विचार करतो असे सांगणाऱ्या या नेत्यांना निवडणुका आल्या की आपल्यासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यालाही संधी मिळावी, त्याचेही भले करावे याचा न विसरता विसर पडतो हा राजकारणातील विरोधभास विलक्षण आहे.

 ”
 
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content