HomeArchiveघरबसल्या खेळा हे...

घरबसल्या खेळा हे खेळ!

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
“संपूर्ण विश्वात थैमान मांडणाऱ्या कोरोनाच्या धास्तीने काही प्रशस्त, काही लहान खुराड्यात माणसं अक्षरशः नाईलाजाने कोंबून राहिली आहेत. घरात कितीही कटकट असली तरी जिवाच्या भीतीने, तर काहींना पोलिसांच्या, काहींना आपुलकीच्या माणसांमुळे घराबाहेर पडता येत नाही. वैताग येऊनही ‘नाईलाज को क्या इलाज’ म्हणत असतात घरात. पण जिव्हाळा असेल तर हे दिवस सुसह्य होत आहेत काहींचे. तशातच पैशाची आवक थांबल्याने पुढे काय अशाही चिंता सतावत आहेत अनेकांना.”
 
“घरात चार माणसं असतील तर काही भारतीय, काही परदेशी, काही ऑनलाइन खेळ खेळत दिवस छान घालवू शकता. पाहूया कोणते खेळ ते, हो आजच्या भाषेत गेम्स बरं का! भारतीय बैठ्या खेळात काही पारंपरिक आहेत ते बहुधा सर्वांनाच माहीत आहेत. पण व्यस्त दिनक्रमात ते खेळ खेळायला मोठ्याना फुरसत नव्हती नि लहानांना इच्छा! अशात गाण्यांच्या, नावाच्या, म्हणी भेंड्या हा पूर्वापार खेळ, सागरगोट्या, कवड्या, चकल्लास सापशिडी, बुद्धिबळ वगैरे हे माहीत असेलच. काही विस्मरणातही गेलेत.”

 
 
“असो, सापशिडी हा असा एक खेळ त्यात प्रगती गाठण्यासाठी एक शिडी नि त्याला पुढे जाऊ न देण्यासाठी गिळणारा साप! हा खेळ म्हणजे मानवी जीवन पुढे कसे असू शकते याची चुणूक. हे लहानपणीच आपल्या पाल्यांना घरातले शिकवू शकतात. अगदी उच्च स्थानावर जाऊनही योग्य घरात न गेल्यास परत खाली तळाला जाऊ शकता, जीवनाचे हेलकावे हे यातून सांगता येतात. व्यवसाय, धंदा, शेअर मार्केट, सोने-चांदी, जमीमजुमला आदींमधील चढउतार हा गेम दर्शवतो. एकावेळी चार-पाच जण खेळतील असा हा खेळ!”
 
“ट्रॅव्हल परसुट, या खेळात सामान्य ज्ञानाधारीत प्रश्न असतात, त्याची उत्तरे द्यावी लागतात. यातून बरेच काही शिकता येते नि मुलांमध्ये गुंतवणूकविषयक ज्ञान वाढते. ऑपरेशन, हा नवा मोबाईल गेम आहे. अनेक लोकांच्या स्मार्ट फोनमध्ये आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदार म्हणून यातील चढउतार समज वाढवतात. निर्णयक्षमता तपासून पाहणारा हा खेळ आहे.”

 
 
“बुद्धिबळ: राजा, वजीर, उंट, घोडे, हत्ती, प्यादी यांच्या साहाय्याने खेळला जाणार हा खेळ कुठेही खेळून युद्ध खेळण्याचा आनंद देणारा. हा भारतीय खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जातो. चांगले, वाईट, नि बुद्धीचा कस लावून युद्ध कसे जिंकले जाते याचा अनुभव देतो. आता ऑनलाइनदेखील उपलब्ध असल्याने नीट शिकता येतो. एकावेळी दोघेच खेळू शकतात. आपल्या देशातील अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत. त्यात विश्वनाथ आनंद याचा खूपच बोलबाला झाला. मराठीत प्रवीण ठिपसे, खाडिलकर भगिनी, त्याच नवाकाळच्या, यासह अनेकांच्या नावाचा उल्लेख करता येईल.”
 
“मोनोपॉली धंदा जसा हॉटेल, घर, जमीन, प्रॉपर्टी, सट्टा बाजार यातील गुंतवणूक कशी करावी, त्यातील नफा-नुकसान यात कळते. क्ल्यू, हाही खेळ असाच असला तरी यात निरनिराळे सुगावे घेत तपासकौशल्ये कशी वाढवावी हे दिसते. एकप्रकारे गुप्त हेरगिरी नीती दाखवतो. ‘पिक्शनरी’ हा कल्पनाशक्ती लावून कागदावर चित्रे कशी साकारावी हे सांगतो. यातून भविष्याची चित्रे आकार घेऊ शकतात. स्कॉटलंड यार्ड, यात एक गुप्तहेर असतो. तो घटनांचा अंदाज घेत आपला तपास शोध करतो. `जेंगा’ गर्दीच्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या चुकीच्या गोष्टी कशा टाळाव्या याची जाणीव देत योग्य-अयोग्य काय ते सांगतो. `गॉन फिनिश’ हा योग्य वेळेची संधी कशी टिपावी हे सांगणारा खेळ आहे.”
 
 
 

Continue reading

ओडिसी नृत्यगुरु शुभदा वराडकर राष्ट्रीय स्तरावर सन्मानित

मुंबईतल्या बोरीवलीमधल्या अभिनव नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या ओडिसी नृत्याच्या समर्पित कलासाधिका गुरु शुभदा वराडकर यांच्या कलासाधनेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीमार्फत दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य व पारंपारिक कलांच्या विविध क्षेत्रातील कलाकारांना प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान...

कीर्तिकरांच्या पुढाकाराने शरीरसौष्ठवाला नवी ताकद; ५ संघटना एकवटल्या!

अनेक वर्षे फुटीच्या विळख्यात अडकलेल्या मुंबईच्या शरीरसौष्ठवाला अखेर एकीचे दमदार बळ मिळाले आहे. विखुरलेली ताकद, तुकड्यांत विभागलेली संघटना आणि त्यामुळे मागे पडलेले खेळाडू या सर्वांना आता एकजुटीचा ताकद मिळाली आहे. शरीरसौष्ठव खेळाचे आधारस्तंभ, माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पुढाकाराने...

उद्या आनंद घ्या अतुल खांडेकर यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत अतुल खांडेकर यांच्या गायनाचा कार्यक्रम उद्या, १६ ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. यावेळी तबल्यावर रामकृष्ण...
Skip to content