Sunday, September 8, 2024
HomeArchiveग्लोबल ई-कॉन्क्लेव्हचे दुसरे...

ग्लोबल ई-कॉन्क्लेव्हचे दुसरे सत्र संपन्न

Details

 
 
“केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
सध्या देश अभूतपूर्व आव्हानांना सामोरे जात आहे. अशावेळी ग्लोबल आयआयटी अॅल्युमनी कम्युनिटीने सध्याच्या आव्हानांवर मार्ग काढण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेच्या दिग्गज हितचिंतकांना सोबत घेतले आहे. तीन आठवड्याच्या पॅन-आयआयटी ग्लोबल ई- कॉन्क्लेव्हच्या दुसऱ्या सत्रात ग्लोबल आयआयटी अॅल्युमनी आणि भारतीय पॉलिसी मेकर्स, इंडस्ट्री कॅप्टन आणि थर्ड सेक्टर लीडर्सनी कौशल्य आणि नोकऱ्या, आरोग्यसेवा आणि राज्यांच्या पुनर्निर्माणावर चर्चा केली.
 
आयआयटी बॉम्बेचे माजी विद्यार्थी आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी छत्तीगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी ‘रीबिल्डिंग स्टेट्स’ विषयावर मुख्यमंत्र्यांच्या पॅनलमध्ये चर्चा केली. दोघांनीही मागील २० वर्षांमध्ये राज्याच्या विकासाच्या वृद्धीदरावर चर्चा केली. राज्यात स्थानिक आदिवासींसाठी रोजगाराच्या संधी वाढवणे आणि त्यात एनजीओची भूमिका यासाठी कौशल्य विकासाचे महत्त्व समजावून सांगितले.
 

 
 
हरि एस. भारतीया (फाउंडर आणि को चेअरमन, जुबलंट भारतीया ग्रुप) यांनी ‘री-बिल्डिंग हेल्थकेअर’ सेशनचे संचालन केले. यात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. रणदीप गुलेरिया (डायरेक्टर-एम्स, दिल्ली) आणि डॉ. सौम्या स्वामीनाथन (मुख्य शास्त्रज्ञ, डब्ल्यूएचओ) यांनी भाग घेतला. त्यांनी साथीच्या व्यवस्थापनात भारतीय अनुभवावर प्रकाश टाकला. त्यांनी आरोग्यसेवेचे भवितव्य परिभाषित करण्याकरिता मानव-केंद्रित उपचारांसाठी तंत्रज्ञान, डेटा इंटिग्रेशन आणि डेटा शेअरिंग समर्थित हेल्थकेअर इनोव्हेशनवर भर दिला.
 

 
 
डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, साथीच्या आजाराने आपल्याला अनेक महत्त्वाचे धडे शिकवले. अशाप्रकारची साथ आपल्या सार्वजनिक आरोग्य प्रणालीसाठी धोकादायक ठरू शकते. रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला अतिरिक्त प्रयत्न करावे लागले. आपली आरोग्यसेवा प्रणाली क्षमतेपेक्षा कित्येक पटींनी जास्त काम करत आहे. कारण साथीचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वत:ला रिऑर्गनाइज करणे खूप आव्हानात्मक होते. गंभीर रुग्णांची काळजी घेणे हेसुद्धा मोठे आव्हान असल्याचे, आम्हाला लक्षात आले. आपल्याकडे केंद्र, राज्य आणि सार्वजनिक श्रेणीतील रुग्णालये आहेत. मात्र क्रिटिकल केअरमध्ये झालेली गुंतवणूक आणि प्रशिक्षण पुरेसे नव्हते. यामुळे एक अशी स्थिती निर्माण झाली की, प्राथमिक स्तरावर उत्तम क्रिटिकल केअर मॅनेजमेंट विकसित करू शकण्यासारखी वेल्थ स्ट्रॅटजी निर्माण करावी लागली. टेलीमेडिसिनसाठी जिल्हा स्तरावर हेल्थ टेक्नोलॉजीचा वापर करून डॉक्टरांना रुग्णांपर्यंत पोहोचवता येऊ शकते.
 “

Continue reading

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राची बाजी!

गेले दोन वर्षं सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1वर असलेल्या महाराष्ट्रात 2024-2025, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतसुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. थोडक्यात सांगायचे...

उद्यापासून श्री गणेशोत्सव!

उद्यापासून गणेशोत्सव! गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या वातावरणामुळे भाविकांमध्ये आंनद आणि उत्साह संचारतो. श्री गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या...

अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेट अर्पण!

गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ या गणपतीच्या श्लोककाव्याची स्वरभेट लोकप्रिय ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मुंबईतील श्री सिध्दीविनायक मंदिरात मंगळवारी सकाळी श्रींच्या चरणी अर्पण केली. श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर,...
error: Content is protected !!
Skip to content