HomeArchiveगेट वे ऑफ...

गेट वे ऑफ इंडियावर अनुभवता येणारा थरार..

Details

 
 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
“हेरिटेज वास्तू, पर्यावरण संवर्धन, वाहन सुरक्षेचा संदेश देणारा उपक्रम ‘वुई वन इव्हेन्ट’ यांच्या वतीने मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथे रविवार दिनांक २४ नोव्हेंबरला होत आहे. मुंबई शहरात होणाऱ्या हौजी राईड २०१९ या बाईकवरून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाचे यंदाचे दुसरे वर्ष असून याबाबतची क्रीडा क्षेत्रातील उत्सुकता वाढली आहे.”

 
“मुंबईतील पुरातत्व विभागाने सांस्कृतिक वारसा जतन करणारी काही स्थळं निश्चित केली असून दुचाकीवरून स्पर्धकांना त्याचा ठावठिकाणा शोधावा लागणार आहे. त्याचबरोबर सुरक्षित वाहन चालविण्याचे निकषदेखील यंत्रणेच्या माध्यमातून तपासून स्पर्धकांना एकूण १० लाख रूपयांची वेगवेगळ्या वर्गवारीतील पारितोषिके दिली जाणार आहेत. एकप्रकारे ही एक अनोखी सहल आणि सफर असेल. मुंबईतील विविध ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्थळांचा शोध त्यातून घेता येईल. हौजी खेळाप्रमाणे बाईकस्वारांना एक तिकीट व क्ल्यू बुक दिले जाईल. त्यानुसार त्या-त्या क्रमांकावरील स्थळे शोधायची आहेत. संबंधित ठिकाण बरोबर शोधले की नाही, हे स्पर्धकांना त्यांच्याजवळ दिलेल्या यंत्राद्वारे कळणार आहे.”
 
 
“स्पर्धा जिंकण्याच्या भरात त्यांनी बाईक व्यवस्थित चालवली का, वेगमर्यादा ओलांडली का, अर्जंट ब्रेक किती वेळा वापरला याचेही परिक्षण होणार आहे. यंदा स्पर्धकांकडून मोठ्या प्रमाणावर सहभाग आला असून त्यांनी केलेल्या मागणीमुळेच नावनोंदणीची मुदत वाढविण्यात आली आहे. स्पर्धेची अधिक माहिती www.houjiride.com या संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत ९०८२३७५३८३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.”
 
 
 

Continue reading

आता सोने-चांदी-प्लॅटिनम दागिन्यांच्या आयातीला लागणार परवाना!

मुक्त व्यापार करारांचा (एफटीए) गैरवापर रोखण्यासाठी केंद्र सरकारने सोने, चांदी आणि प्लॅटिनम दागिन्यांच्या आयातीवर मोठे निर्बंध लादले आहेत. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) जारी केलेल्या नव्या नियमांनुसार, या दागिन्यांची आयात आता ‘फ्री’ ऐवजी ‘रिस्ट्रिक्टेड’ श्रेणीत टाकण्यात आली असून, आयातीसाठी पूर्वपरवानगी...

बारामतीतला अजितदादांचा उत्तराधिकारी नसणार बिनविरोध?

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांवर आता राजकीय रणधुमाळी उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने विशेषतः बारामतीची निवडणूक 'बिनविरोध' करण्यासाठी आवाहन केले असतानाच, काँग्रेसने राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर ‘मनाचे श्लोक’चा प्रभाव?

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दररोज सकाळच्या परिपाठात समर्थ रामदास स्वामींचे 'मनाचे श्लोक' म्हणणे सक्तीचे करावे, असा प्रस्ताव मुंबई महापालिकेतल्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मांडला आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या बालमनावर चांगले संस्कार घडवण्यासाठी हा प्रस्ताव आहे, असे पेडणेकर यांचे म्हणणे आहे....
Skip to content