HomeArchive‘गार्डन रिच’कडून शंभरावी...

‘गार्डन रिच’कडून शंभरावी युद्धनौका राष्ट्राला अर्पण!

Details
 

 
 
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार”
kharevinay196509@gmail.com
 

“भारतीय नौदलाच्या ताफ्यात जमिनीवर किंवा जमिनीवरील शस्त्रसामग्री,मनुष्यबळ वाहून नेणारी उपयुक्त नौका समारंभपूर्वक दाखल झाली. व्हाईस ऍडमिरल पूर्व नौदल प्रमुख अतुलकुमार जैन यांनी तिला सहभागी करून घेतले. आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम येथे झालेल्या सोहळ्यात भारतीय गोदीतील हा बहुमानाचा क्षण होता. या प्रकारची ही सहावी बोट आहे. शंभरावी युद्ध बोट बांधण्याचा बहुमान मिळवल्याबद्दल कोलकात्याच्या गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनिअर या केंद्र शासनाच्या उपक्रमाचं जैन यांनी अभिनंदन केले.”

 
“सदर बोटीच्या ताफ्यात सामील होण्याचं वॉरंट बोटप्रमुख ले. कमांडर गोपीनाथ नारायणन यांनी वाचून दाखवलं. त्याचवेळी नौदल झेंडा राष्ट्रध्वजाच्या सुरावटीने दिमाखात फडकवला गेला. हिची तैनाती पोर्ट ब्लेअर येथे असेल. या बोटीच्या सामील होण्याने सागरी आणि मानवी मदत, आपत्ती निवारणाच्या कामात उपयोगी कामगिरी बजावली जाईल. शोध नि बचाव कार्य, किनारा अभियान, शोध मोहीम, तटीय गस्त, निरीक्षण कामगिरी अशासाठी हिचा वापर होईल. त्यामुळेच तिला ‘मल्टी रोल’ म्हंटलं जातं. अंदमान निकोबार बेटांच्या परिसरात हिचा वापर केला जाईल. गार्डन रिचचे व्यवस्थापकीय संचालक निवृत्त रिअर ऍडमिरल व्ही. के. सक्सेना, कमोडोर आशुतोष रिधोरकर इतर अधिकारी उपस्थित होते.”
 

“भारतीय नौदलाच्या मागणी नि गरजेनुसार या L C U MARK IV बोटीची बांधणी गार्डन रिचच्या अंतर्गत तंत्रज्ञानी केली. नियोजित कार्यक्रमानुसार पुढील दोन बोटींची बांधणी – प्रगती सुरू असल्याचे या कंपनीने स्पष्ट केलंय. या बोटीमुळे सैन्यसामग्री वहन, रणगाडे, चिलखती सामान किनाऱ्यावर उतरवणं सोपं होणार आहे. इंटिग्रेटेड ब्रिज नि प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टीममुळे यात अधिकची सुलभता येईल. ही बोट ६३ मीटर लांब, ११ मीटर रुंद, ८३० टनाची असून १.७ मीटर इतक्या ओहोटीपर्यंत तरंगू शकते. या बोटीवर दोन MTU डिझेल इंजिन बसवली असून त्याद्वारे बोट १५ नॉटिकल मैल गती घेऊ शकते. मेडक आयुध निर्माण कारखान्यात तयार झालेल्या दोन ३० मिमीच्या CRN 91 बंदुका सज्ज आहेत. चार अधिकारी नि ५६ नाविक असा ताफा तिच्यावर ठेवण्यात आला आहे. दीडशे जणांचं पथकही नेता येतं.”
 
 

 
 

“अशाप्रकारची LCU L-51 भारतीय नौदलात मार्च २०१७ साली दाखल झाली. भविष्यातील ५०० कंपन्यांमध्ये सामील झालेल्या GRSE ने पहिली भारतीय बनावटीची युद्धनौका १९६१ साली ‘भा नौ पो अजय’ ची (INS)बांधणी केली. गेल्या साठ वर्षांत आतापर्यंत बांधणी केलेल्या ७८० विविध बोटीं उभारल्या. त्यात १०० पैकी ६७ भारतीय नौदलासाठी तयार झाल्या तर उर्वरित भारतीय तट रक्षक दल, नि मॉरिशस देश यांना दिल्या गेल्या. या ६७ मध्येही वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत पाणबुडी विरोधी ASW, उथळ पाण्यावरील बोटी, फ्रिगेट्स, मिसाईल कॉर्व्हेट, ASW कॉर्व्हेट्स, टँकर्स, पाहणी बोट, पेट्रोल वेसल्स, फास्ट अटॅक क्राफ्ट अशा निरनिराळ्या प्रकारच्या बोटींचा यात समावेश आहे.”
 

मागील काळात पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी GRSE ने ६०५ कोटी रूपयांची गुंतवणूक केली असून एकाचवेळी २० बोटी बांधण्याची क्षमता आहे. सध्या GRSE कडे २७ हजार ५०० कोटी रूपयांची ऑर्डर आहे. त्यातून मोठी महसूल वृद्धी होईल. बांधणीच्या विविध टप्प्यावर २० जहाजे असून पूर्ण झाल्यावर ती नौदल नि तटरक्षक दलाला सुपूर्द करण्यात येतील असं यावेळी सांगितले गेले. अशीच भरीव कामगिरी सर्वच क्षेत्रात घडत भारत प्रगतीच्या मार्गावर चालत राहो अशा शुभेच्छा द्यायलाच हव्यात नाही का? जय हिंद!
 
 
 
 
 
 
 
पुढील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

एका तंत्रज्ञानाच्या अभावाने बंदी बनवले अभिनंदन वर्थमान यांना !
https://www.kiranhegdelive.com//Encyc/2019/8/17/Abhinav-Varthaman-awarded-by-Virchakra-.html
 

Continue reading

हॉलिवूड नगरीत मराठी अस्मितेचा झंझावात! ‘नाफा’ चित्रपट महोत्सवाला तुफानी प्रतिसाद!!

महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने गेल्या आठवड्यात अमेरिकेत सॅन होजे येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन (नाफा) मराठी फिल्म फेस्टिव्हल २०२६चा तीन दिवसांचा दिमाखदार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अमेरिकेतील भारतीय आणि मराठी रसिकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे संपूर्ण महोत्सवाला...

ओडिसी नृत्यगुरु शुभदा वराडकर राष्ट्रीय स्तरावर सन्मानित

मुंबईतल्या बोरीवलीमधल्या अभिनव नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या ओडिसी नृत्याच्या समर्पित कलासाधिका गुरु शुभदा वराडकर यांच्या कलासाधनेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीमार्फत दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य व पारंपारिक कलांच्या विविध क्षेत्रातील कलाकारांना प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान...

कीर्तिकरांच्या पुढाकाराने शरीरसौष्ठवाला नवी ताकद; ५ संघटना एकवटल्या!

अनेक वर्षे फुटीच्या विळख्यात अडकलेल्या मुंबईच्या शरीरसौष्ठवाला अखेर एकीचे दमदार बळ मिळाले आहे. विखुरलेली ताकद, तुकड्यांत विभागलेली संघटना आणि त्यामुळे मागे पडलेले खेळाडू या सर्वांना आता एकजुटीचा ताकद मिळाली आहे. शरीरसौष्ठव खेळाचे आधारस्तंभ, माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पुढाकाराने...
Skip to content