HomeArchive“गगनयान” मोहिमेवर कोविडचा...

“गगनयान” मोहिमेवर कोविडचा परिणाम शून्य!

Details

 

 
“केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
भारताच्या “गगनयान” या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेच्या प्रक्षेपणावर कोविड-१९ महामारीचा परिणाम होणार नाही आणि याची तयारी योग्य दिशेने सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय अंतराळ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी नुकतीच दिली.
 
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि अंतराळ विभागाची गेल्या एक वर्षातील महत्त्वपूर्ण कामगिरी आणि भविष्यासाठी आखण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या मोहिमांबद्दल माहिती देताना डॉ. सिंह म्हणाले की, कोविड-१९ महामारीमुळे रशियामध्ये चार भारतीय अंतराळवीरांचे प्रशिक्षण थांबवावे लागले. मात्र, इस्त्रोचे अध्यक्ष आणि वैज्ञानिक चमूचे मत असे आहे की, प्रशिक्षण कार्यक्रम आणि प्रक्षेपणाची तारीख यात थोडे अधिक अंतर यापूर्वीच ठेवण्यात आले आहे. अंतराळवीरांचे प्रशिक्षण आता पुन्हा सुरू करण्यात आले आहे. आणि २०२२मध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्धापनदिनापूर्वी नियोजित वेळापत्रकानुसार हे प्रक्षेपण होणार आहे.
 
इस्रोच्या उपक्रमांमध्ये खासगी सहभागाला प्रोत्साहन देण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल सविस्तर माहिती देताना डॉ. सिंह म्हणाले की, “भारतीय राष्ट्रीय अंतराळ प्रोत्साहन आणि प्राधिकरण केंद्र (आयएन-स्पेस)” नावाची नियामक संस्था स्थापन केली जाईल. यामुळे खाजगी कंपन्यांना समान संधी उपलब्ध होतील आणि त्यांचा सहभाग प्रोत्साहित करण्यास मदत होईल. आपल्या अंतराळ मोहिमेची क्षमता आणि संसाधने वाढविण्याबरोबरच खासगी कंपन्यांचा वाढता सहभाग यामुळे प्रतिभावान अंतराळ वैज्ञानिक आणि तज्,ज्ञ जे नवीन संधींच्या शोधात भारताबाहेर जात होते ते बाहेर जाण्यापासून परावृत्त होतील.
 
सध्यातरी याचे प्रक्षेपण पुढील वर्षी करण्याचे नियोजन आहे. या मोहिमेमध्ये मॉड्यूल घेऊन जाण्यासाठी एक लँडर, रोव्हर आणि प्रॉपल्शन सिस्टमचा समावेश असेल. मात्र यात ऑर्बिटर असणार नाही. कारण याआधीचा ऑर्बिटर पूर्णपणे कार्यरत आहे, असे ते म्हणाले.
 “

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content