HomeArchiveखेलो इंडिया युथ...

खेलो इंडिया युथ गेम्स २०१९

Details
खेलो इंडिया युथ गेम्स २०१९

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो

केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने व्दितीय `खेलो इंडिया युथ गेम्स, २०१९’ येत्या आठ जानेवारीपासून पुण्याच्या बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित करण्यात येणार आहेत. २० जानेवारीपर्यंत हा क्रीडा महोत्सव चालणार आहे.
“खेलो इंडिया युथ गेम्स” मध्ये विविध प्रकारच्या १८ खेळांच्या स्पर्धा होणार असून यात १७ वर्षांखालील व २१ वर्षांखालील मुले व मुली सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत संपूर्ण देशामधून भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारा आयोजित राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडू/संघ तसेच राष्ट्रीय क्रीडा संघटनेद्वारा आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील संघ वा खेळाडू, सीबीएससी राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडू तसेच स्पर्धा आयोजक राज्याने निवड केलेले खेळाडू असे सुमारे १२ हजार ५०० खेळाडू, तांत्रिक अधिकारी, क्रीडा प्रशिक्षक व स्वयंसेवक सहभागी होणार आहेत, अशी माहिती राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी दिली.

राज्याचे ७६९ खेळाडू तसेच ७२ मार्गदर्शक यात सहभागी होणार आहेत. या स्पर्धांमधील विविध क्रीडा प्रकार ज्या क्रीडांगणामध्ये होणार आहेत, त्या सर्व क्रीडांगणांच्या प्रवेशद्वारांना महाराष्ट्रातील नामवंत क्रीडापटूंची नावे व त्यांची प्रदर्शनी ठेवण्यात येतील. त्याचप्रमाणे क्रीडा संकुलात स्पोर्टस एक्स्पो व खेळांचा प्रत्यक्ष आनंद घेण्यासाठी विशेष सुविधा ठेवण्यात आली आहे. क्रीडापटू व खेळाडू यांना आवश्यक असणारे फिटनेस व संतुलित आहार या विषयांचे मोफत मार्गदर्शन यावेळी देण्यात येईल. त्याचप्रमाणे क्रीडामधील कौशल्य विकास व करियरच्या संधी याबाबत मोफत मार्गदर्शनचा लाभ युवकांना मिळणार आहे. महाराष्ट्रातील विविध शाळातील खेळाडूंना या स्पर्धा पाहण्यासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना देशातील विविध राज्यातील नामवंत खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे.

खेलो इंडिया युथ गेम्सचे आयोजन महाराष्ट्रात होत असल्यामुळे महाराष्ट्रात क्रीडा संस्कृती निर्माण करण्याची संधी महाराष्ट्राला मिळत आहे. महाराष्ट्रातील शालेय व युवा खेळाडूंनी, क्रीडा स्पर्धांकडे आकर्षित व्हावे व या क्रीडा स्पर्धामध्ये आपला सहभाग नोंदवावा, हे आमचे उदिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content