HomeArchiveक्रीडा प्रशिक्षकांशी आता...

क्रीडा प्रशिक्षकांशी आता चार वर्षांचा करार!

Details

 

 
“केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
नवी दिल्लीः 2024 आणि 2028 च्या ऑलिम्पिकवर केंद्र शासनाने लक्ष केंद्रित केले असताना, ऑलिम्पिकशी बांधिलकी असलेले खेळाडू सातत्याने एका प्रशिक्षकाबरोबर प्रशिक्षण घेतील, त्यासाठी त्यांच्या कामगिरीत सुधारणा घडवून आणण्यासाठी, परदेशी आणि भारतीय प्रशिक्षक आता चार वर्षं ऑलिम्पिक चक्रासह त्यांच्या करारांची आखणी करणार आहेत. टोकियो 2020 ऑलिम्पिक पुढे ढकलण्यात आल्यामुळे सर्व परदेशी प्रशिक्षकांचे करार 30 सप्टेंबर 2021पर्यंत वाढविण्यात येतील.
 
या निर्णयाबद्दल बोलताना, केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू म्हणाले की, क्रीडा क्षेत्रात प्रशिक्षक हा कणा असतो आणि अॅथलिटसाठी योग्य प्रशिक्षण निश्चित करणे, हे ऑलिम्पिकसह सर्व प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताची संधी सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हा निर्णय 2024 आणि 2028च्या ऑलिम्पिक स्पर्धांच्या तयारीसाठी भारताच्या दीर्घकालीन आराखड्याचा एक भाग आहे. प्रशिक्षकांची कामगिरी आणि संबंधित एनएसएफच्या शिफारशीच्या आधारे प्रशिक्षकांचा चार वर्षांचा करार केला जाईल. हा करार जरी चार वर्षांचा असला, तरी या कराराचा दरवर्षी आढावा घेतला जाईल आणि प्रमुख आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमधील खेळाडूच्या कामगिरीद्वारे प्रशिक्षकांच्या सर्वंकष कामगिरीनुसार त्यांच्या करारामध्ये वाढ करण्यात येईल.
 

 
 
सरकारच्या निर्णयावर भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. नरिंदर ध्रुव बत्रा म्हणाले की, अलिकडेच क्रीडामंत्री, एनएसएफचे संबंधित अधिकारी यांच्यासह झालेल्या बैठकीत मुद्दा मांडण्यात आला होता की परदेशी प्रशिक्षकांसह दीर्घकालीन करार करण्यात यावेत. विशेषत्वाने सध्याच्या काही महिन्यांच्या सक्तीच्या मिळालेल्या खंडानंतर या निर्णयामुळे खेळाडूंना आपल्या कारकिर्दीचा मोठा पल्ला गाठण्यास मदत होईल. विद्यमान प्रशिक्षक या खेळाडूंना ओळखतात आणि त्यामुळे ते त्यांना उत्तमरितीने घडवू शकतील. प्रशिक्षकांचे वारंवार बदलणे म्हणजे खेळाडूला नवीन प्रशिक्षकांच्या सिद्धांताशी सातत्याने जुळवून घ्यावे लागते आणि प्रशिक्षकांच्या बाबतीतही तसेच घडते. काहीवेळा याचा खेळाडूंच्या कामगिरीवरही परिणाम होतो. या निर्णयामुळे 2022च्या आशियाई क्रीडा स्पर्धांवर आणि 2023मध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धांवरही सकारात्मक परिणाम होऊ शकेल. सर्व प्रशिक्षक निश्चितच खेळाडूंची कामगिरी वृद्धींगत करतील आणि भारतासाठी अधिक पदके मिळवण्याचा प्रयत्न करतील.
 “

Continue reading

पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित

व्हिक्टोरिया (सेशेल्स) येथे एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा पहिला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्त्वासाठी, विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, सागरी...

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...
Skip to content