HomeArchive`कोयना सोळशी’चे रक्तदान...

`कोयना सोळशी’चे रक्तदान शिबीर संपन्न!

Details
  

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
कोरोनाच्या संकटकाळात विविध रुग्णालयांमध्ये रक्तपुरवठ्याची कमतरता भासू नये यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान शिबिराच्या केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत केएसके क्रीडा प्रतिष्ठानचे प्रमुख सल्लागार गणेश शिंदे व अध्यक्ष विजय शिंदे तसेच संपूर्ण कमिटी यांनी मुंबईतल्या गोरेगाव पूर्व येथील उमया माता मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिराचे नुकतेच आयोजन केले.
 
 
  
 
 
“या कार्यक्रमाला अनेक रक्तदात्यांनी उपस्थिती दर्शवली. याप्रसंगी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरसेवक स्वप्नील टेंबवलकर, तुळशीराम शिंदे, प्रकाश शिंदे, शशांक कामत, शाखाप्रमुख संजय जैस्वाल, महेश शिंदे, बाळकृष्ण गटे, राजू रजपूत, महेश करमरकर, संतोष परब, उद्योजक डी. के. पिंपरे, मारूती पारठे, सचिन बोवलेकर, लक्ष्मण कदम, ललेश भगत, आरती बारी यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवसेनेचे विभागप्रमुख आमदार सुनील प्रभू व युवा सेनेचे अमोल कीर्तिकर यांनी गणेश शिंदे व त्यांच्या टिमचे फोन करून अभिनंदन केले.”

 

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content