HomeArchiveकांदिवलीच्या आकुर्ली रोडच्या...

कांदिवलीच्या आकुर्ली रोडच्या वाहतूककोंडीवर प्रभावी मात्रा!

Details
कांदिवलीच्या आकुर्ली रोडच्या वाहतूककोंडीवर प्रभावी मात्रा!

    18-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

केएचएल न्यूज ब्युरो
 
मुंबईच्या कांदिवली (पूर्व) आकुर्ली रोडच्या अरूंद भुयारी मार्गामुळे होणाऱ्या वाहतूककोंडीच्या समस्येचा येत्या काही दिवसात उतारा होणार आहे. कांदिवली पूर्वचे भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांच्या प्रयत्नाने या भुयारी मार्गाच्या रूंदीकरणाची वर्कऑर्डर जारी करण्यात आली असून आठवड्याभरात काम सुरू होईल. या कामाचे भूमीपूजन नुकतेच खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार भातखळकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
 
आकुर्ली रोडच्या वाहतूककोंडीच्या समस्येचा कांदिवली पूर्वमधील लोकांना अनेक वर्ष त्रास होत आहे. स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी ही समस्या सोडवण्याच्या दिशेने गेली पाच वर्षे जोरदार प्रयत्न केले. एकीकडे त्यांनी महिंद्रा कंपनीपासून समतानगरपर्यंत जाणाऱ्या पर्यायी डीपी रोडचा मार्ग निर्वेध केला असताना आकुर्ली भुयारी मार्गाची समस्यासुद्धा निर्णायकरित्या सोडवली. त्यांच्या प्रयत्नाने या भुयारी मार्गाच्या रूंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
हा भुयारी मार्ग १६ फुटांचा असून याची रूंदी ३३.१० फूट म्हणजे दुप्पटीपेक्षा जास्त होणार आहे. रूंदीकरणासाठी २६ कोटी ८३ लाख रूपये खर्च करण्यात येणार असून काम ३ वर्षांत पूर्ण होईल. हा अरूंद भुयारी मार्ग वाहतूककोंडीचे महत्त्वाचे कारण बनला होता. या कामासाठी मेट्रो ऑथेरिटीची परवानगी मिळाली आहे. मतदारांना दिलेले एक महत्त्वाचे आश्वासन पूर्ण करू शकलो याचे मला समाधान आहे, असे भातखळकर म्हणाले.
 
आमदार भातखळकर यांना नागरी समस्यांची नेमकी जाण असून त्यांच्यामध्ये या समस्या सोडवण्यासाठी लागणारी धमकही पुरेपूर आहे, या शब्दांत खासदार गोपाळ शेट्टी यांनी भातखळकर यांचे कौतुक केले. भूमीपूजनाला कांदिवली पूर्वतील नागरीकांनी भर पावसात मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
 
 ”

केएचएल न्यूज ब्युरो

मुंबईच्या कांदिवली (पूर्व) आकुर्ली रोडच्या अरूंद भुयारी मार्गामुळे होणाऱ्या वाहतूककोंडीच्या समस्येचा येत्या काही दिवसात उतारा होणार आहे. कांदिवली पूर्वचे भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांच्या प्रयत्नाने या भुयारी मार्गाच्या रूंदीकरणाची वर्कऑर्डर जारी करण्यात आली असून आठवड्याभरात काम सुरू होईल. या कामाचे भूमीपूजन नुकतेच खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार भातखळकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
 
आकुर्ली रोडच्या वाहतूककोंडीच्या समस्येचा कांदिवली पूर्वमधील लोकांना अनेक वर्ष त्रास होत आहे. स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी ही समस्या सोडवण्याच्या दिशेने गेली पाच वर्षे जोरदार प्रयत्न केले. एकीकडे त्यांनी महिंद्रा कंपनीपासून समतानगरपर्यंत जाणाऱ्या पर्यायी डीपी रोडचा मार्ग निर्वेध केला असताना आकुर्ली भुयारी मार्गाची समस्यासुद्धा निर्णायकरित्या सोडवली. त्यांच्या प्रयत्नाने या भुयारी मार्गाच्या रूंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
“हा भुयारी मार्ग १६ फुटांचा असून याची रूंदी ३३.१० फूट म्हणजे दुप्पटीपेक्षा जास्त होणार आहे. रूंदीकरणासाठी २६ कोटी ८३ लाख रूपये खर्च करण्यात येणार असून काम ३ वर्षांत पूर्ण होईल. हा अरूंद भुयारी मार्ग वाहतूककोंडीचे महत्त्वाचे कारण बनला होता. या कामासाठी मेट्रो ऑथेरिटीची परवानगी मिळाली आहे. मतदारांना दिलेले एक महत्त्वाचे आश्वासन पूर्ण करू शकलो याचे मला समाधान आहे, असे भातखळकर म्हणाले.”
 
“आमदार भातखळकर यांना नागरी समस्यांची नेमकी जाण असून त्यांच्यामध्ये या समस्या सोडवण्यासाठी लागणारी धमकही पुरेपूर आहे, या शब्दांत खासदार गोपाळ शेट्टी यांनी भातखळकर यांचे कौतुक केले. भूमीपूजनाला कांदिवली पूर्वतील नागरीकांनी भर पावसात मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.”
 
Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content