HomeArchiveकला संचालनालय प्रवेशः...

कला संचालनालय प्रवेशः वेळापत्रक जाहीर

Details
  

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
“कला संचालनालय, मुंबई अंतर्गत असलेल्या अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२०–२१ प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर झाले असून ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही नोंदणी केली नाही त्यांनी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन कला संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.”
 
“शैक्षणिक वर्ष २०२०–२१करिता कला संचालनालय, मुंबई यांच्या नियंत्रणाखालील प्रथम वर्ष पदविका/प्रमाणपत्र कलाविषयक अभ्यासक्रम (मुलभूत अभ्यासक्रम, कला शिक्षक प्रशिक्षक आर्ट मास्टर) प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर झाले आहे. उमेदवारांनी सुधारित वेळापत्रकानुसार http://cetcell.net/doa/ या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी नोंदणी केली आहे, त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. इच्छुक उमेदवारांनी www.doa.org.in या संकेतस्थळावर दिलेले पात्रतेचे नियम, प्रक्रिया आणि सूचना यांचे काळजीपूर्वक वाचन करून अर्ज भरावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.”
 
सुधारित प्रवेश प्रक्रियेच्या नियोजित तारखा खालीलप्रमाणे
 
“१. मुलभूत अभ्यासक्रम, कला शिक्षक प्रशिक्षण व आर्ट मास्टर या पदविका/प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवाराद्वारे संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे, महाविद्यालय व अभ्यासक्रम निवडणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे यासाठी २० ऑक्टोबर २०२० पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.”
 
२. उमेदवारांसाठी तात्पुरत्या निवड याद्या प्रदर्शित करणे : २२ ऑक्टोबर २०२०
 
३. सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी तात्पुरत्या निवड यादीबाबत काही तक्रार असल्यास त्या सादर करणे : २३ ऑक्टोबर २०२०
 
४. उमेदवारांसाठी अंतिम निवड यादी प्रसिध्द करणे : २६ ऑक्टोबर २०२०
 
५. संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेण्याचा दिनांक (संबंधित महाविद्यालयांनी उमेदवाराची मूळ कागदपत्रे तपासून प्रवेश देण्यात यावेत) : २७ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२०

Continue reading

शशी शेखर वेम्पती सेन्सॉर बोर्डाचे नवे अध्यक्ष

केंद्र सरकारने शशी शेखर वेम्पती यांची केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ अर्थात सेन्सॉर बोर्ड (सीबीएफसी) च्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ६ मे २०२६ रोजीच्या अधिसूचनेत ही घोषणा केली. शशी शेखर वेम्पति हे पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून तीन...

‘ऑपरेशन सिंदूर’च्या वर्षपूर्तीला मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी

काश्मीर खोऱ्यातल्या पहलगाममध्ये पाक अतिरेक्यांनी तेथली पर्यटकांवर धर्म विचारून गोळ्या घातल्याच्या घटनेचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकिस्तानवर केलेल्या ऑपरेशन सिंदूरला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अतिशय प्रतिष्ठित आणि संवेदनशील मानल्या जाणाऱ्या कुलाबा येथील 'ताज...

उद्या सम्राट सरकारचा विस्तार तर ममता पायऊतार!

बिहारमधील सम्राट चौधरी सरकारच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार उद्या गुरुवारी, ७ मे रोजी पाटण्याच्या ऐतिहासिक गांधी मैदानावर पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष उपस्थिती लावणार असून, पाटणा विमानतळ ते गांधी मैदान असा त्यांचा भव्य 'मेगा रोड शो'देखील...
Skip to content