HomeArchiveएसव्हीएस इंग्लिश स्कूल...

एसव्हीएस इंग्लिश स्कूल महोत्सवात लोकनृत्यांचे बहारदार दर्शन!

Details
एसव्हीएस इंग्लिश स्कूल महोत्सवात लोकनृत्यांचे बहारदार दर्शन!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्यरो
भारताच्या खेड्यापाड्यात जपली जाणारी परंपरागत संस्कृती, अगदी नागपूरच्या गोंड, गुजरातच्या डिंगी संस्कृतीपासून सिक्कीमच्या लोकप्रिय घंटू नृत्त्यापर्यंत तसेच काश्मीरच्या रौफ नृत्त्यापासून केरळच्या कन्नियार कालीपर्यंत, अनेक राज्यांतील पारंपरिक लोकनृत्त्यांचे बहारदार सादरीकरण करून देशाचे सांस्कृतिक दर्शन मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिर येथे नुकतेच घडविण्यात आले.

वरळीच्या सहकारी शिक्षण समूह संस्थेच्या इंग्लिश स्कूलच्या प्री प्रायमरीच्या लहानग्या चिमुरड्यापासून दहावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी अगदी थक्क करणारी नृत्त्ये सादर केली. निमित्त होतं, शाळेचा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव.. ‘इंडोव्हिजन’.

जुन्या-नव्या संगीतावर होणाऱ्या नृत्त्यस्पर्धा आणि रॅप गाण्यांच्या काळात, भारताच्या खेड्यापाड्यात टिकून राहिलेली संस्कृती आपण विसरत चाललो आहोत. हा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आज ही संकल्पना मांडल्याचे शाळेच्या मुख्याध्यपिका लीना मनोज यांनी स्पष्ट केले. प्री प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यपिका अमीना पटेल यांनी मुलांनी आणि शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीची माहिती दिली. एकापाठोपाठ एक लोकगीते आणि लोकनृत्य त्यांच्या अस्सल वेषभूषेत विद्यार्थ्यांनी अगदी सहजपणे सादर केली. अत्यंत अवघड, तोल सावरायला लावणारी आव्हानात्मक दिवा नृत्येही लीलया झाली. तेव्हा उपस्थित पालकांचे ऊर कौतुकाने भरून आले. टाळ्यांच्या गजरात त्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.

अगदी 15 दिवसांच्या तालमीत मुलांनी केलेले सादरीकरण नेत्रदीपक होते. त्याचे सर्वच उपस्थित पाहुण्यांनी कौतुक केले. यावेळी झालेल्या समारंभात, शाळेत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सीमा भोसले आणि नेहा वाईंजकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आर्य आढाव आणि विनायक घाडीगावकर यांनी दशक्रिया चित्रपटात काम केले आहे. त्यामध्ये आर्य आढाव याला त्याबद्दल सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरविण्यात आले आहे. त्याबद्दल दोन्ही बालकलाकारांचेही यावेळी कौतुक करण्यात आले.

जास्त टक्केवारी असणाऱ्या हुशार मुलांना घेऊन शाळा चालविणाऱ्या अनेक संस्था मुंबईत आहेत. पण गोरगरीब आणि झोपडपट्टीतील मुलांना आणून त्यांना दर्जेदार शिक्षण सुविधा उपलब्ध करून, त्यांची सर्वांगीण प्रगती करण्याचे मोठे कार्य एसव्हीएस संस्था करीत आहे. या शाळेतून घडलेले विध्यार्थी विविध क्षेत्रात नाव कमवत आहेत. काबाडकष्टाने कमावलेल्या यशाचे सर्वानाच अप्रूप असते, अशा भावना व्यक्त करून शाळेच्या पुढील प्रगतीसाठी शक्य ती मदत करण्याचे आश्वासन यावेळी मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी दिले. तसेच विविध क्षेत्रात नामवंत होण्यासाठी कष्ट करा, प्रयत्न करा आणि यशस्वी व्हा, असा शुभेच्छा संदेशही त्यांनी मुलांना दिला.

प्रस्तावनेत, संस्थेचे अध्यक्ष डी. एस. कदम यांनी शाळेने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच विविध क्षेत्रात शाळेच्या मुलांनी केलेल्या कामगिरीचाही आढावा घेतला. मुलांनी केलेल्या लोकनृत्त्यांच्या प्रत्येक सादरीकरणानंतर त्या नृत्त्याची निवड, त्यासाठी घेतलेली मेहनत याचा आढावा घेत, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याचे मनोगत प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रवाही सूत्रसंचालन सीमा अमरे यांनी केले.

कार्यक्रमास शाळेच्या विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक यांच्यासह मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, आमदार सुनील शिंदे, बँकेचे जेष्ठ संचालक सिद्धार्थ कांबळे, विठ्ठल भोसले, जयश्री पांचाळ, रमण ठाकूर, अजय जोशी, सौम्यदीती मोंडल, बँकेचे सहायक सरव्यवस्थापक सतीश पाटणकर, पी. एन. घोरपडे, संदीप सुर्वे, आर. आर. शिंदे यांच्यासह मुंबई बँकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.”
 
“केएचएल न्यूज ब्यरो

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content