HomeArchiveएंजल ब्रोकिंगचे स्मार्ट...

एंजल ब्रोकिंगचे स्मार्ट एपीआय लॉन्च!

Details

 

 
“केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
भारतीय रिटेल गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीला चालना देण्यासाठी एंजल ब्रोकिंगने स्मार्टएपीआयच्या माध्यमातून एपीआय एकत्रिकरण सुरू केले आहे. फ्री-टू-इंडिटग्रेट फीचरद्वारे स्टार्टअप्स आणि स्टॉक सल्ल्यासह कोणताही प्लॅटफॉर्म एंजल ब्रोकिंगद्वारे रिअल-टाइम ट्रेड्स करण्यासाठी उपलब्ध होईल. तसेच अल्गो ट्रेडर्सना ५ प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये त्यांचे प्रोग्राम डिप्लॉय करता येतील.
 
सध्या हा प्लॅटफॉर्म पायथॉन, नॉज, जावा, आर, गो या भाषांना सपोर्ट करतो. स्मार्ट एपीआयने २.८३ दशलक्ष एंजल ब्रोकिंग ग्राहकांसाठी (ऑक्टोबर २०२०पर्यंत) एंड टू एंड ट्रेडिंग सेवा विकसित करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. वरीलपैकी कोणत्याही भाषेत अल्गोरिदम तयार करण्याची इच्छा असलेले एंजल ब्रोकिंगचे ग्राहक स्मार्ट एपीआयच्या माध्यमातून थेट त्यांच्या खात्यात खात्यात ऑर्डरवर अंमलबजावणी करू शखतील. उदा. ग्राहकांना सामोरे जाणारे अल्गो ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स आता एंजल ब्रोकिंग प्लॅटफॉर्ममध्ये एकिकृत होऊ शकतात. याद्वारे या ब्रोकिंग फर्मच्या माध्यमातून ग्राहकांना अखंडपणे ट्रेड्सची सेवा देऊ शकतात.
 
एंजल ब्रोकिंगचे सीईओ विनय अग्रवाल म्हणाले की, तंत्रज्ञानप्रणित नूतनाविष्कारांमध्ये एंजल ब्रोकिंग नेहमीच अग्रेसर असते. स्मार्ट एपीआय आपल्या यूझर्सना मजबूत प्लॅटफॉर्म तयार करण्यास मदत करते. अखंडपणे अल्गो ट्रेडिंग करण्यासही सक्षम करते. एवढेच नाही तर, ग्राहकांच्या उद्देशाने अल्ट्रामॉडर्न सेवेच्या पुढील लाटेचेही स्वागत करते. हा प्लॅटफॉर्म अनेक प्रोग्रामिंग लँग्वेजला सपोर्ट करेल आणि नजीकच्या भविष्यात त्यात आणखी भर घालण्याच्या दिशेने काम करेल अशी आशा आहे.
एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे सीएमओ प्रभाकर तिवारी म्हणाले की, ग्राहकांना हा प्लॅटफॉर्म स्कोपच्या बाबतीत उपयुक्त वाटेल तसेच नफा आणि उत्कृष्ट यूझर अनुभवाच्या बाबतीतही तो ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, असा आम्हाला विश्वास आहे. हा प्लॅटफॉर्म ग्राहकांना अनेक कोडिंग भाषेत एपीआय प्रदान करतो, यासोबतच, आमच्या तज्ञांच्या पॅनलमार्फत त्यांचे प्रश्न सोडवण्यासही मदत करतो.
 ”
 

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content