HomeArchiveआसूसचा कमर्शियल पीसी...

आसूसचा कमर्शियल पीसी मार्केटमध्ये प्रवेश!

Details
  

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
संगणक हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील प्रतिष्ठित कंपनी आसूस इंडियाने कमर्शियल पीसी मार्केटमध्ये प्रवेशाची घोषणा केली असून उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीसह ‘एक्सपर्ट सिरीज’ ब्रँडही लॉन्च केला आहे.
 
“यात लॅपटॉप्स, डेस्कटॉप्स आणि ऑल-इन-वन्समधील ११ मॉडेल्सच्या विस्तृत पोर्टफोलिओसह सर्वच की एंटरप्राइझेस व सर्व क्षेत्रातील ग्राहकांची गरज लक्षात घेत विंडोज १० प्रो सपोर्टसह १०व्या जनरल इंटेल प्रोसेसरचा समावेश आहे. एक्सपर्ट सिरीजसह, आम्ही उद्योजकांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, नाविण्य आणि आमच्या वाणिज्यिक संगणकाचे अद्वितीय असे प्रदर्शन अनुभवण्याची संधी उपलब्ध करुन देत असल्याचे आसूस इंडिया व दक्षिण आशियाचे सिस्टम बिझिनेस ग्रुपचे रीजनल डायरेक्टर लिओन यू म्हणाले.”
  

 
“आसूस एक्सपर्ट श्रेणीमध्ये एक्स्पर्ट बुक श्रेणीतील ६ लॅपटॉप्स म्हणजे फ्लॅगशिप एक्सपर्टबुक बी ९, एक्सपर्टबुक पी २, आसूस प्रो एक्सपर्टबुक पी १ मालिका (पी १४४० एफए, पी १४१० सीजेए, पी १५४५ एफए आणि पी १५१० सीजेए) यांचा समावेश आहे. आसूस प्रो एक्स्पर्ट सेंटरमध्ये एक्स्पर्ट सेंटर डी ३, एक्सपर्ट सेंटर डी ६ आणि एक्सपर्ट सेंटर डी ८ या ३ डेस्कटॉप्सचा समावेश आहे. तसेच ऑल इन वन मालिकेत व्ही २२२ एफए आणि व्ही २४१ एफए पीसी दाखल केले आहेत.”
 
“प्रोफेशन स्टँडर्ड आणि बिझनेस करणाऱ्या उद्योगांना डोळ्यापुढे ठेऊन कमर्शियल पीसीची आसूस एक्स्पर्ट सिरीज तयार करण्यात आली आहे. वेगाने वाढणारा व्यवसाय संगणक क्षेत्रातील गरजांसाठी आव्हानात्मक आहे. यामुळे याची मागणी वाढत आहे. याचमुळे आसूस एक्स्पर्ट सिरीज वाणिज्यिक उत्पादनांची गुणवत्ता, विश्वसनीयता आणि लवचिकतेला ध्यानात घेत बनवण्यात आली आहे. ज्यायोगे उद्योजक व व्यापाऱ्यांना याचा संगणक क्षेत्रातील गुंतवणुकीचा फायदा होईल व ते येणाऱ्या संकटांचा सामना करू शकतील.”

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content