HomeArchiveआयआयटी मुंबईने सुरू...

आयआयटी मुंबईने सुरू केले स्व-मदत संकेतस्थळ

Details
  

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
“केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी काल सकाळी आयआयटी मुंबईने आपल्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या बंधू-स्वमदत गट संकेतस्थळाचे उद्घाटन, आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. सुभाशिष चौधरी यांच्या उपस्थितीत केले.”
 
“चांगली शैक्षणिक संस्था म्हणजे जेथे प्रत्येक विद्यार्थ्याला आपले स्वागत होत आहे आणि काळजी घेतली जाते. सुरक्षित आणि उत्साही शैक्षणिक वातावरण, विस्तृत शैक्षणिक पध्दतीचा अनुभव, उत्तम भौतिक पायाभूत सुविधा, उचित संसाधनांचा वापर येथे शैक्षणिक अनुकूलतेसाठी केला जातो. विद्यार्थी हे शैक्षणिक व्यवस्थेचे प्रमुख भागीदार आहेत. उत्साही महाविद्यालयीन जीवन उच्च दर्जाच्या शिकण्या-शिकविण्यासाठी आवश्यक असते. या ठिकाणी विद्यार्थ्यांना खेळ, संस्कृती/कला क्लब, पर्यावरण क्लब, कार्यकारी क्लब, सामाजिक सेवा प्रकल्प अशा प्रकारच्या विविध ठिकाणच्या भरपूर संधी देण्यात याव्यात, असे ते म्हणाले.”
 

 
“‘बंधू’ची रचना आयआयटीतील समुपदेशक आणि बाह्य तज्ज्ञ यांनी संयुक्तपणे तयार केली असून त्यात त्यांना डीन प्रा. टी कडू (विद्यार्थी कल्याण) आणि प्रा.सुहास जोशी (माजी विद्यार्थी आणि सामूहिक संबंध) यांनी सहाय्य केले आहे. शैक्षणिक जीवनात येणाऱ्या कॉलेज जीवनातील ताणापासून, अभ्यासाचा तणाव आणि मानसिक आरोग्य यासारख्या सर्व प्रकारच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी हे सहाय्य करेल. बंधूमधे विविध वाचनीय लेख, माजी विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी प्रवास, तज्ज्ञांचे पॉडकास्ट्स आणि स्वतःचा शोध घेण्यासाठी आवश्यक साधने यांचा समावेश आहे.”
 
“बंधूची संकल्पना 1992 सालच्या माजी विद्यार्थ्यांच्या 2017 साली झालेल्या रौप्य महोत्सवी पुनर्मिलनाच्या वेळी मांडली गेली. त्यांनी आयआयटी मुंबईला मदत करण्याची प्रतिज्ञा केली आणि विद्यार्थ्यांच्या भावनिक समृद्धीत वृद्धी करण्याचे ठरविले. स्व-मदत संकेतस्थळ हे त्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. ते या प्रकल्पाची काळजीपूर्वक अंमलबजावणी करत आहे. आपण अशा काळात आहोत, जिथे तणावामुळे त्रस्त व्हायला होते. आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी, त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खंबीर होण्याची गरज आहे, असे आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. सुभाशिष चौधरी यावेळी म्हणाले.”

 
“अनेक गोष्टी सुरूवातीच्या टप्प्यात प्रभावीपणे हाताळता आल्या तर विद्यार्थ्यांना सहाय्य करून विद्यार्थ्यांना ही आव्हाने पेलणे शक्य होऊन, एकामागोमाग एक येणारी संकटे (डॉमिनो ईफेक्ट) टाळता येतात. त्याचप्रमाणे आयआयटी मुंबईतील आधार व्यवस्थेची मदत घ्यायची वेळ कोणती हेही यामुळे लक्षात येईल, असे आयआयटीच्या 1992च्या तुकडीतील माजी विद्यार्थिनी रेखा कोयता यावेळी म्हणाल्या. प्रख्यात सिनेनिर्माता आणि आयआयटीचे माजी विद्यार्थी नीतेश तिवारी हेदेखील या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.”

Continue reading

हॉलिवूड नगरीत मराठी अस्मितेचा झंझावात! ‘नाफा’ चित्रपट महोत्सवाला तुफानी प्रतिसाद!!

महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने गेल्या आठवड्यात अमेरिकेत सॅन होजे येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन (नाफा) मराठी फिल्म फेस्टिव्हल २०२६चा तीन दिवसांचा दिमाखदार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अमेरिकेतील भारतीय आणि मराठी रसिकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे संपूर्ण महोत्सवाला...

ओडिसी नृत्यगुरु शुभदा वराडकर राष्ट्रीय स्तरावर सन्मानित

मुंबईतल्या बोरीवलीमधल्या अभिनव नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या ओडिसी नृत्याच्या समर्पित कलासाधिका गुरु शुभदा वराडकर यांच्या कलासाधनेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीमार्फत दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य व पारंपारिक कलांच्या विविध क्षेत्रातील कलाकारांना प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान...

कीर्तिकरांच्या पुढाकाराने शरीरसौष्ठवाला नवी ताकद; ५ संघटना एकवटल्या!

अनेक वर्षे फुटीच्या विळख्यात अडकलेल्या मुंबईच्या शरीरसौष्ठवाला अखेर एकीचे दमदार बळ मिळाले आहे. विखुरलेली ताकद, तुकड्यांत विभागलेली संघटना आणि त्यामुळे मागे पडलेले खेळाडू या सर्वांना आता एकजुटीचा ताकद मिळाली आहे. शरीरसौष्ठव खेळाचे आधारस्तंभ, माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पुढाकाराने...
Skip to content