HomeArchiveआता सगळेच सापडणार...

आता सगळेच सापडणार `बार’मध्ये!

Details

 

 
 
विनय गजानन खरे
 ज्येष्ठ पत्रकार
 
 
देशाची राजधानी दिल्लीतील प्रदूषण कमी होण्याचे नाव घेत नाहीये. त्यामुळे अनेक आजार तिथे उद्भवत आहेत. हे वायू प्रदूषण होतेय ते प्रामुख्याने वाहन नि शेतातील धान्याची ताटं जाळल्याने! यावर आता आला आहे उपाय ‘ऑक्सिजन बार’! शुद्ध हवेचा श्वास घ्यायचा असेल तर २९९ रूपये देऊन १५ मिनिटे तुम्ही शुद्ध हवा घेऊन ताजेतवाने होऊ शकता. दिल्लीत हा बार सुरू होत आहे.

 
“दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने या समस्येवर प्रभावी उपाय करण्यासाठी हायड्रोजन आधारित जापनी तंत्र वापरण्याची व्यवहार्यता तपासून पाहण्यास सांगितले आहे. गेल्या १५ दिवसांत दुसऱ्यांदा दिल्लीची परिस्थिती गंभीर बनली आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी स्वतः याकडे लक्ष वेधल्याने दिल्ली, यु. पी.सह इतर राज्यात याच्या वापराची शक्यता तपासण्यास मुख्य न्या. रंजन गोगोई नि न्या. शरद बोबडे यांनी केंद्र सरकारला सांगितले आहे.”
 
 
जपान विद्यापीठाने एनसीआर नि यु. पी.मधील वायू प्रदूषणाच्या स्थितीचा अभ्यास केला आहे. हा शोध पूर्णतः नवीन असून हे तंत्र यासाठी वापरता येईल. संशोधक विश्वनाथ जोशी यांचा न्यायालयाला परिचय करून देत त्यांच्याकडून हायड्रोजन तंत्रामुळे प्रदूषण संपू शकते असे त्यांनी सांगितले.
 
 
“जीवघेण्या वायू प्रदूषणामुळे दिल्लीची अवस्था बिकट होत आहे. यावर नोबल पुरस्कार विजेता रोनाल्ड कॉस यांनी एक उपाय सुचवला आहे. त्यात धान्याची ताटं जाळण्यासाठी पर्याय दिला आहे. यासाठी २० हजार कोटी खर्च करून दोन लाख कोटी रूपयाची हानी थांबवता येईल. शेतकरी नि सरकार मिळून एक करार करावा, बाजूच्या सरकारांनी शेतकरी जी धान्य ताटे आपला खर्च कमी करण्यासाठी जाळतात तितकी रक्कम सरकारने त्यांना द्यावी.”
 
 
ताज्या बातमीनुसार लगतच्या पंजाब राज्यातील पठाणकोट जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लागोपाठ चौथ्यांदा प्रदूषणरहित जिल्हा असा सन्मान मिळवला आहे. धान्य भुसा नि ताटं जाळण्याच्या प्रकारात घट झाली आहे. याबाबत जागरूकता येण्यासाठी तेथील कृषी विभागाने सर्व स्तरावर मोहीम राबवली. सदर जिल्ह्यात २७ हजार हेक्टरवर ८० हजार मे. टन होणाऱ्या उत्पादनाने दीड लाख मे. टन ताटं नि भुसा तयार होतो. त्याच्या विक्रीपोटी ४२०० रूपये हेक्टरप्रमाणे ११२ कोटी ८ लाख ७५ हजार रूपये शेतकऱ्यांनी कमावले. ही रक्कम शेतकरी गहू लागवडीवर खर्च करणार आहेत.
 
 
“याच्या एक टन जळण्याने चारशे किलो जैविक कार्बन, ५.५ किलो नायट्रोजन, २.३ किलो फॉस्फरस, २५ किलो पोटॅश, १.२ किलो सल्फर नि मातीतील सूक्ष्म जीवांचा नाश होतो. यासह अनेक विषारी वायू तयार होऊन श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची आग होणे, त्वचा रोग आदींचा धोका वाढतो, असे कृषी तज्ज्ञ डॉ. अमरिक सिंह यांनी सांगितले. बॅगासपासून होणारी वीज निर्मिती, पशु खाद्य, प्लायवूड निर्मिती असा याचा उपयोग होऊ शकतो. शेतकरी गट स्थापन करून जिल्हा प्रशासनाने दहा मशिनरी बँक स्थापन केल्या. त्यातून ८०% अनुदानावर त्या उपयोगासाठी दिल्या जातात. याच्या समूळ उच्चटनासाठी पी ए यु हॅप्पीसिडर, मल्चर, चॉपर, ताटं कापण्यासाठी, पसरवण्यासाठी मशीन दिल्या जातात. त्या महाग असल्याने एकटा शेतकरी खरेदी करू शकत नाही. जिल्हाधिकारी रामबीर यांनी ५७० शेतकऱ्यांना अनुदान रक्कम नि प्रमाणपत्र देत सन्मानित केले. यावेळी अन्य अधिकारी वर्ग उपस्थित होता.”
 
 
 
 
 
सरकार देणार अडीच हजार रूपये
 
 
“धान्य अवशेष जाळणाऱ्या शेतकऱ्यांना पंजाब सरकारने प्रति एकर अडीच हजार रूपये मोबदला देण्याचे ठरविले आहे. कृषी सचिव काहन सिंह पननु यांच्यानुसार बासमतीशिवाय अन्य लागवड नि पाचएकपर्यंत हा लाभ दिला जाईल. मात्र, त्याने आपल्या शेतात कोणत्याही भागात आग लावली नसावी ही अट असेल. यासाठी ग्रामपंचायतमध्ये त्याने स्वघोषणापत्रात मागितलेली माहिती नोव्हेंबरअखेर द्यावी. तथापि, धानाच्या कोणत्याही आग लावू नये, हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान ठरेल, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे.”

Continue reading

हॉलिवूड नगरीत मराठी अस्मितेचा झंझावात! ‘नाफा’ चित्रपट महोत्सवाला तुफानी प्रतिसाद!!

महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने गेल्या आठवड्यात अमेरिकेत सॅन होजे येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन (नाफा) मराठी फिल्म फेस्टिव्हल २०२६चा तीन दिवसांचा दिमाखदार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अमेरिकेतील भारतीय आणि मराठी रसिकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे संपूर्ण महोत्सवाला...

ओडिसी नृत्यगुरु शुभदा वराडकर राष्ट्रीय स्तरावर सन्मानित

मुंबईतल्या बोरीवलीमधल्या अभिनव नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या ओडिसी नृत्याच्या समर्पित कलासाधिका गुरु शुभदा वराडकर यांच्या कलासाधनेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीमार्फत दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य व पारंपारिक कलांच्या विविध क्षेत्रातील कलाकारांना प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान...

कीर्तिकरांच्या पुढाकाराने शरीरसौष्ठवाला नवी ताकद; ५ संघटना एकवटल्या!

अनेक वर्षे फुटीच्या विळख्यात अडकलेल्या मुंबईच्या शरीरसौष्ठवाला अखेर एकीचे दमदार बळ मिळाले आहे. विखुरलेली ताकद, तुकड्यांत विभागलेली संघटना आणि त्यामुळे मागे पडलेले खेळाडू या सर्वांना आता एकजुटीचा ताकद मिळाली आहे. शरीरसौष्ठव खेळाचे आधारस्तंभ, माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पुढाकाराने...
Skip to content