HomeArchiveअ. भा. स्थानिक...

अ. भा. स्थानिक स्वराज्य संस्थेचे कार्य अनुकरणीय – समरजितसिंह गायकवाड

Details
अ. भा. स्थानिक स्वराज्य संस्थेचे कार्य अनुकरणीय – समरजितसिंह गायकवाड

    04-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
मुंबईत मागील ९३ वर्षांपासून नागरी स्वराज्य संस्था व लोकप्रतिनिधींसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष व बडोद्याचे माजी महापौर रणजित चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली संस्था भरीव कामगिरी करत आहे. या संस्थेचे कार्य खरोखरीच कौतुकास्पद व अनुकरणीय आहे, असे गौरवोद्गार बडोद्याचे श्रीमंत महाराजा समरजितसिंह गायकवाड यांनी नुकतेच काढले.
 
 
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा स्थापना दिवस व दीक्षांत समारंभ संस्थेच्या अंधेरी येथील मेयर हॉल येथे थाटात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण तर कच्छ शहराच्या महाराणी रोहिणी देवी, मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त व संस्थेचे वरिष्ठ सल्लागार जयराज फाटक, संस्थेचे कुलगुरू प्रकाश वाणी, संस्थेचे उपसंचालक आशिष देवस्थळी व उत्कर्षा कवडी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या देशभरातील ३६ केंद्रातील विविध पदविका अभ्यासक्रमांच्या यशस्वी विद्यार्थ्यांना महाराजा समरजितसिंह गायकवाड यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
 
 
आज येथील संस्थेच्या यशस्वी विद्यार्थ्यांची खरी सुरूवात आहे. आज शिक्षणाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे आपल्या आवडीचे शिक्षण घेतल्यावर आपल्या, राज्याच्या व देशाच्या विकासाकडे विद्यार्थ्यांनी जातीने लक्ष द्यावे. हवामान बदलामुळे तापमानाच्या पातळीत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे वाढत्या तापमानवाढीचा धोका लक्षात घेऊन या ९३ वर्षीय अनुभवी संस्थेने आता पर्यावरणविषयक अभ्यासक्रम संस्थेत सुरू केले पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
 
 

 
 
 
आज आपल्या देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून जगाच्या १७ टक्के लोकसंख्या आपल्या देशाची आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. आज शहरीकरणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. स्मार्ट सिटीची संकल्पना केंद्र सरकार राबवत आहे. ही संकल्पना यशस्वी होण्यासाठी त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणाऱ्या ध्येयवादी अधिकाऱ्यांची आज गरज असल्याचेही गायकवाड म्हणाले.
 
 
प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण यांनी संस्थेच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या ९३ वर्षांपासून नागरी व्यवस्थापनाच्या विकास प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी आणि त्यायोगे नागरी जीवनाचा दर्जा उंचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या प्रगतशील संस्थेतर्फे संस्थांच्या कामकाजात उत्कृष्ठ दर्जा व प्राविण्य राखण्यासाठी पाया रचणे, मार्ग शोधणे, क्षमतेत वाढ करणे अशा संस्थांच्या कार्यात गुणात्मक बदल करून त्यांचे स्थानिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गुणात्मक व सुधारित प्रशिक्षण देण्यासाठी रणजित चव्हाण सतत प्रयत्नशील असतात. कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका स्मिता गवाणकर यांनी केले.
 

 

 
 

 
 

 
 

 
 

 
 
 

 
 
 
 ”

 

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
“मुंबईत मागील ९३ वर्षांपासून नागरी स्वराज्य संस्था व लोकप्रतिनिधींसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष व बडोद्याचे माजी महापौर रणजित चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली संस्था भरीव कामगिरी करत आहे. या संस्थेचे कार्य खरोखरीच कौतुकास्पद व अनुकरणीय आहे, असे गौरवोद्गार बडोद्याचे श्रीमंत महाराजा समरजितसिंह गायकवाड यांनी नुकतेच काढले.”
 
 
“अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा स्थापना दिवस व दीक्षांत समारंभ संस्थेच्या अंधेरी येथील मेयर हॉल येथे थाटात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण तर कच्छ शहराच्या महाराणी रोहिणी देवी, मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त व संस्थेचे वरिष्ठ सल्लागार जयराज फाटक, संस्थेचे कुलगुरू प्रकाश वाणी, संस्थेचे उपसंचालक आशिष देवस्थळी व उत्कर्षा कवडी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या देशभरातील ३६ केंद्रातील विविध पदविका अभ्यासक्रमांच्या यशस्वी विद्यार्थ्यांना महाराजा समरजितसिंह गायकवाड यांच्या हस्ते गौरवण्यात आले.”
 
 

“आज येथील संस्थेच्या यशस्वी विद्यार्थ्यांची खरी सुरूवात आहे. आज शिक्षणाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे आपल्या आवडीचे शिक्षण घेतल्यावर आपल्या, राज्याच्या व देशाच्या विकासाकडे विद्यार्थ्यांनी जातीने लक्ष द्यावे. हवामान बदलामुळे तापमानाच्या पातळीत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे वाढत्या तापमानवाढीचा धोका लक्षात घेऊन या ९३ वर्षीय अनुभवी संस्थेने आता पर्यावरणविषयक अभ्यासक्रम संस्थेत सुरू केले पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.”
 
 

 
 
 
आज आपल्या देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून जगाच्या १७ टक्के लोकसंख्या आपल्या देशाची आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. आज शहरीकरणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. स्मार्ट सिटीची संकल्पना केंद्र सरकार राबवत आहे. ही संकल्पना यशस्वी होण्यासाठी त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणाऱ्या ध्येयवादी अधिकाऱ्यांची आज गरज असल्याचेही गायकवाड म्हणाले.
 
 
“प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण यांनी संस्थेच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या ९३ वर्षांपासून नागरी व्यवस्थापनाच्या विकास प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी आणि त्यायोगे नागरी जीवनाचा दर्जा उंचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या प्रगतशील संस्थेतर्फे संस्थांच्या कामकाजात उत्कृष्ठ दर्जा व प्राविण्य राखण्यासाठी पाया रचणे, मार्ग शोधणे, क्षमतेत वाढ करणे अशा संस्थांच्या कार्यात गुणात्मक बदल करून त्यांचे स्थानिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गुणात्मक व सुधारित प्रशिक्षण देण्यासाठी रणजित चव्हाण सतत प्रयत्नशील असतात. कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका स्मिता गवाणकर यांनी केले.”

 

 

 
 

 
 

 
 

 
 

 
 
 

 

 

 
 

 
 
 
 

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content