HomeArchiveअसा रंगला श्रावण...

असा रंगला श्रावण संध्येचा सोहळा!

Details
असा रंगला श्रावण संध्येचा सोहळा!

    28-Aug-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
 
मुंबई – मराठी ग्रंथसंग्रहालय नायगाव शाखा आणि भरारी प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय गावस्कर हॉल येथे श्रावणसंध्येच्या कार्यक्रमात तीन पुस्तकांचे प्रकाशन व निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन मोठ्या थाटात पार पडले.
 
 
कोकण मराठी साहित्य परिषद केंद्रीय कार्याध्यक्ष नमिता कीर यांच्या अध्यक्षतेखाली, मान्यवरांच्या हस्ते लता गुठे लिखित ‘संत चैतन्याचा मेळा’, स्मिता भागवत लिखित ‘क्रांती चिरायू होवो’ व राजेंद्र पाटील लिखित ‘आठवण’ कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. सुप्रसिद्ध साहित्यिक अशोक बेंडखळे यांनी ‘संत चैतन्याचा मेळा’ या पुस्तकावर सुंदर विवेचन केले. आजच्या आणि उद्याच्या पिढीला हे पुस्तक प्रेरणादायी ठरेल, असे ते म्हणाले. मानवी जीवनात अध्यात्माचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे या पुस्तकाचे महत्त्व काय आहे, हे त्यांनी विश्लेषणपूर्वक सांगितले.
 
 
लेखक, प्राध्यापक अविनाश कोल्हे यांनी त्यांच्या मनोगतात ‘क्रांती चिरायू होवो’ या पुस्तकाचे कौतुक केले आणि स्वातंत्र्यलढ्यामध्ये ज्या स्वातंत्र्यवीरांनी बलिदान केले त्यांची आठवण सदैव स्मरणात राहवी, म्हणून अशा पुस्तकाची निर्मिती करण्याचे महत्त्वाचे काम भरारी प्रकाशनच्या लता गुठे करत आहेत, असेही ते म्हणाले.
 
 
आपल्या अध्यक्षीय भाषणात नमिता कीर म्हणाल्या की, अभ्यासाला पूरक आणि समाजाला प्रेरणा व प्रोत्साहन देणारी पुस्तकं वैचारिक बदल घडवितात. संत चैतन्याचा मळा, या पुस्तकात १४ संतांचा समावेश केलेला आहे. हे पुस्तक लिहिण्यासाठी अनेक ग्रंथांचा अभ्यास लता गुठे यांनी केलेला दिसतो. अशी पुस्तकं लिहिण्यासाठी अध्यात्म समजून घेऊन ते आत मुरवावे लागते तेव्हाच अशी पुस्तकं एखादी व्यक्ती लिहू शकते. प्रत्येक वर्षी १५ ऑगस्टला क्रांतीवीरांवर एक पुस्तक प्रकाशित करण्याचा वसा लता गुठे यांनी घेतला आहे आणि तो अतिशय स्तुत्य आहे.
 
 
स्मिता भागवत यांनी, क्रांती चिरायू होवो, हे पुस्तक अतिशय ओघवत्या शैलीत लिहिले आहे, असे सांगितले. चंद्रशेखर आझाद, दुर्गा देवी होरा, भगवती होरा यांचे क्रांती लढ्यातील कार्य संक्षिप्त रूपात परंतु वेध घेणारे आहे. त्यांच्याबरोबर असलेल्या अनेक क्रांतिकारकाचा उल्लेखही या पुस्तकात वाचायला मिळतो आणि त्यांच्या कार्याची तीव्रता आपल्या मनाला भेदून जाते. संत चैतन्याचा मेळा आणि क्रांती चिरायू होवो हे दोन्ही पुस्तकं संग्रही ठेवण्यायोग्य व उद्याच्या पिढीसाठी फार महत्त्वाची आहेत.
 
 
श्रावणसंध्या काव्यसंमेलनातील निमंत्रित कवी/कवयित्री यांनी सादर केलेल्या निसर्ग कवितांना रसिकांनी भरभरून दाद दिली. गौरी कुलकर्णी, अनुराधा नेरूरकर, कविता राजपूत, शांताराम लोखंडे, प्रशांत राऊत, सूर्यकांत मालुसरे, रेणुका पाटील व इतर कवींनी कविता सादर केल्या. विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. त्यामध्ये गुरूनाथ तेंडुलकर, भूपेश मिस्त्री, संजय भिडे, शिवाजी गावडे, अशोक शिंदे, मंदाकिनी भट, शैलेश शेट्ये व इतर मान्यवर उपस्थित उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा नाईक व लता गुठे यांनी केले.
 
 
 
 
 
 
पुढील बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

खर्नीचा राजा रवाना..
https://www.kiranhegdelive.com//Encyc/2019/8/29/News-On-Ganpati-Photos.html
 ”

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
 

मुंबई – मराठी ग्रंथसंग्रहालय नायगाव शाखा आणि भरारी प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय गावस्कर हॉल येथे श्रावणसंध्येच्या कार्यक्रमात तीन पुस्तकांचे प्रकाशन व निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन मोठ्या थाटात पार पडले.
 
 

“कोकण मराठी साहित्य परिषद केंद्रीय कार्याध्यक्ष नमिता कीर यांच्या अध्यक्षतेखाली, मान्यवरांच्या हस्ते लता गुठे लिखित ‘संत चैतन्याचा मेळा’, स्मिता भागवत लिखित ‘क्रांती चिरायू होवो’ व राजेंद्र पाटील लिखित ‘आठवण’ कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. सुप्रसिद्ध साहित्यिक अशोक बेंडखळे यांनी ‘संत चैतन्याचा मेळा’ या पुस्तकावर सुंदर विवेचन केले. आजच्या आणि उद्याच्या पिढीला हे पुस्तक प्रेरणादायी ठरेल, असे ते म्हणाले. मानवी जीवनात अध्यात्माचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे या पुस्तकाचे महत्त्व काय आहे, हे त्यांनी विश्लेषणपूर्वक सांगितले.”
 
 

“लेखक, प्राध्यापक अविनाश कोल्हे यांनी त्यांच्या मनोगतात ‘क्रांती चिरायू होवो’ या पुस्तकाचे कौतुक केले आणि स्वातंत्र्यलढ्यामध्ये ज्या स्वातंत्र्यवीरांनी बलिदान केले त्यांची आठवण सदैव स्मरणात राहवी, म्हणून अशा पुस्तकाची निर्मिती करण्याचे महत्त्वाचे काम भरारी प्रकाशनच्या लता गुठे करत आहेत, असेही ते म्हणाले.”
 
 

“आपल्या अध्यक्षीय भाषणात नमिता कीर म्हणाल्या की, अभ्यासाला पूरक आणि समाजाला प्रेरणा व प्रोत्साहन देणारी पुस्तकं वैचारिक बदल घडवितात. संत चैतन्याचा मळा, या पुस्तकात १४ संतांचा समावेश केलेला आहे. हे पुस्तक लिहिण्यासाठी अनेक ग्रंथांचा अभ्यास लता गुठे यांनी केलेला दिसतो. अशी पुस्तकं लिहिण्यासाठी अध्यात्म समजून घेऊन ते आत मुरवावे लागते तेव्हाच अशी पुस्तकं एखादी व्यक्ती लिहू शकते. प्रत्येक वर्षी १५ ऑगस्टला क्रांतीवीरांवर एक पुस्तक प्रकाशित करण्याचा वसा लता गुठे यांनी घेतला आहे आणि तो अतिशय स्तुत्य आहे.”
 
 

“स्मिता भागवत यांनी, क्रांती चिरायू होवो, हे पुस्तक अतिशय ओघवत्या शैलीत लिहिले आहे, असे सांगितले. चंद्रशेखर आझाद, दुर्गा देवी होरा, भगवती होरा यांचे क्रांती लढ्यातील कार्य संक्षिप्त रूपात परंतु वेध घेणारे आहे. त्यांच्याबरोबर असलेल्या अनेक क्रांतिकारकाचा उल्लेखही या पुस्तकात वाचायला मिळतो आणि त्यांच्या कार्याची तीव्रता आपल्या मनाला भेदून जाते. संत चैतन्याचा मेळा आणि क्रांती चिरायू होवो हे दोन्ही पुस्तकं संग्रही ठेवण्यायोग्य व उद्याच्या पिढीसाठी फार महत्त्वाची आहेत.”
 
 

“श्रावणसंध्या काव्यसंमेलनातील निमंत्रित कवी/कवयित्री यांनी सादर केलेल्या निसर्ग कवितांना रसिकांनी भरभरून दाद दिली. गौरी कुलकर्णी, अनुराधा नेरूरकर, कविता राजपूत, शांताराम लोखंडे, प्रशांत राऊत, सूर्यकांत मालुसरे, रेणुका पाटील व इतर कवींनी कविता सादर केल्या. विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. त्यामध्ये गुरूनाथ तेंडुलकर, भूपेश मिस्त्री, संजय भिडे, शिवाजी गावडे, अशोक शिंदे, मंदाकिनी भट, शैलेश शेट्ये व इतर मान्यवर उपस्थित उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा नाईक व लता गुठे यांनी केले.”
 
 
 
 
 
 
पुढील बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

खर्नीचा राजा रवाना..
https://www.kiranhegdelive.com//Encyc/2019/8/29/News-On-Ganpati-Photos.html
 
पुढील बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

खर्नीचा राजा रवाना..
https://www.kiranhegdelive.com//Encyc/2019/8/29/News-On-Ganpati-Photos.html

Continue reading

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...
Skip to content