HomeArchiveअशोक चव्हाण बालेकिल्ला...

अशोक चव्हाण बालेकिल्ला टिकवणार का?

Details
अशोक चव्हाण बालेकिल्ला टिकवणार का?

    15-Apr-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अतुल माने
atulm2001@gmail.com
नांदेड लोकसभा मतदारसंघात यावेळी चुरशीची निवडणूक होत असून यावेळी विद्यमान खासदार अशोक चव्हाण आपला बालेकिल्ला टिकवण्यात यशस्वी होणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे. येत्या गुरूवारी म्हणजेच 18 एप्रिलला होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात नांदेड मतदारसंघात मतदान होत असून येथे 14 उमेदवार रिगणात आहेत. 2014 च्या मोदी लाटेत अशोक चव्हाण यांनी आपला किल्ला राखला होता. आता ते पुन्हा निवडणूक लढवत असून त्यांच्यासमोर भाजप-शिवसेना युतीचे प्रतापराव पाटील चिखलीकर कडवी लढत देत आहेत.

मुळातच चव्हाण यावेळी निवडणूक लढविण्यास तयार नव्हते. यावेळी ते नाराज असल्याचे समजते. त्यांना यावेळी त्यांच्या पत्नीला उमेदवारी हवी होती. पण पक्षाने त्यांनाच उमेदवारी दिली. येथे वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगे निवडणूक लढवत आहेत. त्यांची उमेदवारी निर्णायक ठरणार आहे. या मतदारसंघात 1852 मध्ये पहिली निवडणूक झाली. त्यावेळी शंकरराव तेलकीकर आणि देवराव कांबळे हे दोघे निवडून गेले होते. त्यानंतर 1957 मध्ये झालेल्या निवडणुकीत हरिराव सोनुले विजयी झाले. पुन्हा 1962 मध्ये काँग्रेसचे तुळशीदास जाधव निवडून आले तर 1967 आणि 1971 च्या निवडणुकीत व्यंकटराव तारोडकर विजयी झाले. त्यानंतर केशवराव धोंगडे, जनता पक्षाचे उमेदवार 1977 च्या निवडणुकीत निवडून आले.

त्यानंतर 1980 च्या दशकात चव्हाण कुटुंबाचे वर्चस्व या मतदारसंघावर सुरू झाले. माजी मुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण 1980 आणि 1984 च्या निवडणुकीत सलग विजयी झाले. ते केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रीसुद्धा होते. 1987 च्या पोटनिवडणुकीत अशोक चव्हाण पहिल्यांदा येथून खासदार झाले. पण चव्हाण यांचे मन दिल्लीत रमले नाही आणि ते राज्यात पुन्हा सक्रीय झाले आणि त्यांनी येथे मुख्यमंत्रीपदसुद्धा भूषवले. दरम्यान, 2014 पर्यंत झालेल्या विविध निवडणुकीत कधी जनता दल तर कधी काँग्रेस असे उमेदवार विजयी झाले. त्यामध्ये भास्करराव पाटील खतगावकर, सूर्यकांता पाटील यांचा समावेश आहे.

नांदेड आणि चव्हाण यांचे घनिष्ठ नाते आहे. या कुटुंबातील सर्व सदस्यांचा नांदेडकरांबरोबर नेहमीच सलोख्याचे सबंध राहिले आहेत. यावेळी अशोक चव्हाण यांच्यासमोर प्रतापराव चिखलीकर यांचे तगडे आव्हान आहे. त्यातच वंचितचा उमेदवार कोणाची मते खातो हे महत्त्वाचे आहे. चव्हाण आपला किल्ला टिकविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नरेंद्र मोदी यांनीसुद्धा येथे सभा घेऊन चव्हाण यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. ही कोंडी तोडून चव्हाण पुन्हा यशस्वी होतात हे लवकरच समजेल..”
 

Continue reading

हॉलिवूड नगरीत मराठी अस्मितेचा झंझावात! ‘नाफा’ चित्रपट महोत्सवाला तुफानी प्रतिसाद!!

महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने गेल्या आठवड्यात अमेरिकेत सॅन होजे येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन (नाफा) मराठी फिल्म फेस्टिव्हल २०२६चा तीन दिवसांचा दिमाखदार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अमेरिकेतील भारतीय आणि मराठी रसिकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे संपूर्ण महोत्सवाला...

ओडिसी नृत्यगुरु शुभदा वराडकर राष्ट्रीय स्तरावर सन्मानित

मुंबईतल्या बोरीवलीमधल्या अभिनव नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या ओडिसी नृत्याच्या समर्पित कलासाधिका गुरु शुभदा वराडकर यांच्या कलासाधनेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीमार्फत दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य व पारंपारिक कलांच्या विविध क्षेत्रातील कलाकारांना प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान...

कीर्तिकरांच्या पुढाकाराने शरीरसौष्ठवाला नवी ताकद; ५ संघटना एकवटल्या!

अनेक वर्षे फुटीच्या विळख्यात अडकलेल्या मुंबईच्या शरीरसौष्ठवाला अखेर एकीचे दमदार बळ मिळाले आहे. विखुरलेली ताकद, तुकड्यांत विभागलेली संघटना आणि त्यामुळे मागे पडलेले खेळाडू या सर्वांना आता एकजुटीचा ताकद मिळाली आहे. शरीरसौष्ठव खेळाचे आधारस्तंभ, माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पुढाकाराने...
Skip to content