HomeArchiveअमेरिकी डॉलर कमकुवत...

अमेरिकी डॉलर कमकुवत झाल्याने सोन्याला झळाळी!

Details
  

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
मागील आठवड्यात स्पॉट गोल्डमध्ये सुमारे १.१ टक्क्यांची वाढ नोंदवली. अमेरिकी सरकारच्या डोविश दृष्टिकोनाचे हे परिणाम असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
 
“अमेरिकी डॉलरची कमकुवतता आणि कमी व्याज दर आणि भरपूर उत्तेजनाची अपेक्षा हे मुख्य मुद्दे असून गुंतवणुकदार यामुळेच सोन्याकडे आकर्षित होतात. जेरोम पॉवेल यांनी रोजगाराला चालना मिळण्याकरिता आणि महागाई कमी करण्याकरिता आखलेल्या नवीन धोरणामुळे अमेरिकेच्या तिजोरीत चांगली वाढ झाली आहे. यामुळे बाजारातील भावनांना आधार मिळाला असून त्याचा परिणाम सोन्यातील नफ्यावर झाला. अमेरिकेचे कोरोना मदत विधेयक संसदेत अजूनही कठीण स्थितीत आहे. तथापि, डॉलरची कमकुवत किंमत आणि डोव्हिश स्टान्समुळे गुंतवणुकदारांसाठी सोने आकर्षित करणारे ठरले. एमसीएक्सवर आज सोने उच्चांक गाठण्याची अपेक्षा आहे.”
  

 
” कच्चे तेल: मागील आठवड्यात, कच्चे तेल ०.९२ टक्क्यांनी वधारले आणि अमेरिकेतील मालसाठ्यात घट झाली. मागील आठवड्यात दोन सारख्या वादळांनी तेलाच्या किंमतींना बराचसा आधार मिळाला. उष्णकटिबंधीय वादळ आणि चक्रीवादळ मार्कोचे संकट आले. त्यामुळे मेक्सिकोच्या आखातात बहुतांश तेलाचे उत्पादन बंद पडले. दररोज सुमारे १.५६ दशलक्ष बॅरलचे उत्पादन ठप्प होते, जे गल्फ मेक्सिको तेल उत्पादनाच्या सुमारे ८४% आहे.”
 
“एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या ताज्या माहितीनुसार, अमेरिकेतील कच्च्या तेलाच्या मालसाठ्यात मागील आठवड्यात ४.७ दशलक्ष बॅरलची घट झाली. ती ३.७ दशलक्ष बॅरल एवढीच होणे अपेक्षित होते. महामारी तसेच नव्याने संसर्ग झालेल्या रुग्णांतील वाढीमुळे कच्च्या तेलाचा नफा मर्यादित राहिला.”
  

 
बेस मेटल: मागील आठवडा एमसीएक्सवरील बेस मेटलकरिता सकारात्मक ठरला कारण त्यापैकी अनेक धातू उच्चांकी स्थितीत होते. निकेल हा मागील आठवड्यात सर्वाधिक नफा कमावणारा ठरला. चिनी कारखान्यांमधील काम सुरू झाल्याने धातूंचीही गरज वाढली. डॉलरच्या किंमतीत घट हा धातूंच्या किंमतींना आधार देणारा एक पैलू आहे.
 
चीन आणि अमेरिकेदरम्यानच्या व्यापार करारातील पहिल्या टप्प्याची निश्चिती हे औद्योगिक मेटलच्या किंमती वाढण्याचे आणखी एक कारण आहे. चीन हा साथीच्या आजारातून मुक्त झाला असून स्टीलची वाढही वेगाने होत आहे.
 
“तांबे: मागील आठवड्यात एलएमई तांबेदेखील १ टक्क्याने वाढले. अधिक प्रोत्साहनाच्या अपेक्षेने लाल धातूच्या किंमतीत आणखी वाढ झाली. एलएमई तांबे यादीत, ८९,३५० टन खाली गेली आहे, जी मागील आठवड्यातील १४ वर्षांतील सर्वात कमी पातळी आहे.”

Continue reading

हॉलिवूड नगरीत मराठी अस्मितेचा झंझावात! ‘नाफा’ चित्रपट महोत्सवाला तुफानी प्रतिसाद!!

महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने गेल्या आठवड्यात अमेरिकेत सॅन होजे येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन (नाफा) मराठी फिल्म फेस्टिव्हल २०२६चा तीन दिवसांचा दिमाखदार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अमेरिकेतील भारतीय आणि मराठी रसिकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे संपूर्ण महोत्सवाला...

ओडिसी नृत्यगुरु शुभदा वराडकर राष्ट्रीय स्तरावर सन्मानित

मुंबईतल्या बोरीवलीमधल्या अभिनव नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या ओडिसी नृत्याच्या समर्पित कलासाधिका गुरु शुभदा वराडकर यांच्या कलासाधनेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीमार्फत दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य व पारंपारिक कलांच्या विविध क्षेत्रातील कलाकारांना प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान...

कीर्तिकरांच्या पुढाकाराने शरीरसौष्ठवाला नवी ताकद; ५ संघटना एकवटल्या!

अनेक वर्षे फुटीच्या विळख्यात अडकलेल्या मुंबईच्या शरीरसौष्ठवाला अखेर एकीचे दमदार बळ मिळाले आहे. विखुरलेली ताकद, तुकड्यांत विभागलेली संघटना आणि त्यामुळे मागे पडलेले खेळाडू या सर्वांना आता एकजुटीचा ताकद मिळाली आहे. शरीरसौष्ठव खेळाचे आधारस्तंभ, माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पुढाकाराने...
Skip to content