HomeArchiveअब तक.. प्रदीप...

अब तक.. प्रदीप शर्मा!

Details
अब तक.. प्रदीप शर्मा!

    13-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
 
विनोद साळवी
कार्यकारी संपादक, महाराष्ट्र दिनमान
Vinodsalvi1@gmail.com
 
 
 
नव्वदच्या दशकात मुंबई, ठाण्यातील संघटित गुन्हेगारीचा कर्दनकाळ ठरलेले धडाकेबाज पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आता शुभ्र वेशात आपल्याला दिसणार आहेत. पोलीस दलातून स्वेच्छानिवृत्तीसाठी त्यांनी राज्य सरकारकडे केलेला अर्ज अखेर मंजूर झाला आहे. या पत्राच्या एका कोपर्याृत ‘गोपनीय’ असा उल्लेखही होता. तरीही शर्मा यांच्यासारख्या पोलीस अधिकार्यायचं हे पत्र गोपनीय न राहता सोशल मीडियावर भलतंच व्हायरल झालं. ते प्रसिद्धीचे कॅमेरे आपल्याकडे वळविण्यासाठी, प्रदीप शर्मा यांनी ३५ वर्षांच्या पोलीससेवेत १००हून अधिक गुंडांचा खात्मा केला व चकमकफेम नावाने ते कायम प्रसिद्धीझोतात राहिले. परंतु, आता राजकारणाचं तिकिट कन्फर्म झाल्याने श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन राजकीय व सामाजिक प्रवासासाठी ते जोमाने कामाला लागले आहेत.
 
 
ढोंगीपणा, भपंकपणा आणि भ्रष्टाचाराने पोखरलेल्या राजकारणात नवं काही करून दाखवण्यासाठी थेट निवडणूक आखाड्यात उतरण्याच्या तयारीत असलेल्या प्रदीप शर्मा यांना आपण यानिमित्तानं दिलसे शुभेच्छा देऊया. लखनभय्या बनावट चकमक, भ्रष्टाचाराचे आरोप आदी प्रकरणांमुळे बराच काळ ते विजनवासात होते. या सर्वातून बाहेर पडलेल्या शर्मा यांनी पुन्हा ठाणे खंडणीविरोधी पथकाची कमान सांभाळली होती. त्यानंतर पहिल्याच दणक्यात खंडणीखोरीच्या प्रकरणात कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला उचलले. पण, आता खाकीत जीव रमत नाही, अशी मन की बात जाणलेल्या शर्मा यांना खादीची ओढ लागली होती. खरतरं राजकीय चकमकी घडविण्यासाठी प्रदीप शर्मा २०१४ मध्येच सज्ज झाले होते. रिपाइं आठवले गटाकडून अंधेरी पूर्व मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता परंतु, ऐनवेळी भाजपाच्या हस्तक्षेपामुळे शर्मा यांची राजकीय एन्ट्री लांबणीवर पडली.
 
 
पी. एस. फाऊंडेशन नावाच्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ते समाजकारणात आधीपासूनच कार्यरत आहेत. आता ते नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांचे चिरंजीव क्षितीज ठाकूर यांच्याविरोधात शिवसेनेकडून उतरतील, हे जवळपास निश्चित झाले आहे. अगदी पुढे-मागे झाले तरी अंधेरी पूर्वेतून मैदानात उतरण्यासाठी ते सज्ज आहेत. राजकारणात नशीब आजमावणारे प्रदीप शर्मा हे पहिलेच पोलीस अधिकारी नाहीत. याआधी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त एम. एन. रॉय, राज्याचे माजी पोलीस महासंचालक एम. एन. सिंहही खाकीतून खादीमय झाले आहेत. यातील प्रदीप शर्मा हे १९८३ च्या बॅचचे पोलीस अधिकारी. संघटित गुन्हेगारीला कापरं भरवणार्यां च्या या बॅचमध्ये विजय साळस्कर, प्रफुल्ल भोसले, रवींद्र आंग्रे, अरूण बोरूडे, अस्मल मोमीन, राजू पिल्लई आदी सारथी होते. या सर्वांनी माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबई, ठाण्यातील संघटित गुन्हेगारीचा सफाया केला. खाकीतले अधिकारी ऐनकेनप्रकारे कायमच चर्चेत राहिले आहेत ते वाद, विवाद आणि अंडरवर्ल्डसोबतच्या संबंधांमुळे. कोण याच्या टोळीवर तर कोण त्याच्या टोळीवर खार खातो आणि मेहरबान आहे. त्यातही खादीचे उगमस्थानही संघटित टोळ्या अन् गुन्हेगारीतूनच हे आपल्याला चांगलेच ज्ञात आहे. त्यामुळं स्वच्छ प्रतिमा आणि स्वच्छ राजकारण हा बदलेला चेहरा राजकारणात दाखल होत असलेल्या पोलीसवाल्यांमुळे पाहयला मिळेल, अशी अपेक्षा धरूया.
 
 

 
 
चकमकमफेम प्रदीप शर्मा मे २०२०मध्ये पोलीस सेवेतून निवृत्त होणार होते. तत्पूर्वी त्यांनी स्वेच्छेने घेतलेला निवृत्तीचा निर्णय हे राजकारणात काही नवं करण्याचं धाडस मानावं. भाकरीचा चंद्र शोधताना सामान्य माणूस राजकारणापासून कोसो दूर असला तरी राजकारणात नव काय घडतंय, याची त्याला कमालीची उत्सुकता असते. प्रशासकीय अधिकारी, अभिनेता, अभिनेत्री, वकील, डॉक्टर, अभियंता ते अगदी सामान्य कार्यकर्त्यालाही राजकीय वलय हवे असते. काही जण आयुष्याचा पूर्वाध, मध्य आणि उत्तरार्ध राजकारणात प्रवेशासाठी साधतात. प्रशासकीय सेवेतून बाहेर पडून दिल्लीचे मुख्यमंत्री बनलेले अरविंद केजरीवाल, मध्य प्रदेशच्या रायपूर जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी ओ. पी. चौधरी, छत्तीसगढचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांनीही राजकारणात उतरण्यासाठी जिल्हाधिकारी पदावर पाणी सोडले होते. १९६०च्या आयएएस बॅचचे अधिकारी यशवंत सिन्हा यांनीही १९८४मध्ये प्रशासकीय सेवेला रामराम ठोकून राजकारणात प्रवेश केला होता. ते माजी पंतप्रधान दिवंगत चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री बनले होते. माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार, मणिशंकर अय्यर, नटवर सिंह, हरदीप सिंह पुरी, राजकुमार सिंह ते अगदी अल्फोन्स कनाथनम् आदींचा प्रशासन ते राजकारण असा प्रवास आहे. प्रदीप शर्मा यांच्यासारख्या जिगरबाज आणि धडाडीच्या पोलीस अधिकार्याजमुळे देशाचं पर्यायाने राज्याचं राजकारण कूस बदलते आहे. त्यांना नव्या कारकीर्दीसाठी शुभेच्छा.”

 

 
 
 
विनोद साळवी
“कार्यकारी संपादक, महाराष्ट्र दिनमान”
Vinodsalvi1@gmail.com
 
 
 
“नव्वदच्या दशकात मुंबई, ठाण्यातील संघटित गुन्हेगारीचा कर्दनकाळ ठरलेले धडाकेबाज पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आता शुभ्र वेशात आपल्याला दिसणार आहेत. पोलीस दलातून स्वेच्छानिवृत्तीसाठी त्यांनी राज्य सरकारकडे केलेला अर्ज अखेर मंजूर झाला आहे. या पत्राच्या एका कोपर्याृत ‘गोपनीय’ असा उल्लेखही होता. तरीही शर्मा यांच्यासारख्या पोलीस अधिकार्यायचं हे पत्र गोपनीय न राहता सोशल मीडियावर भलतंच व्हायरल झालं. ते प्रसिद्धीचे कॅमेरे आपल्याकडे वळविण्यासाठी, प्रदीप शर्मा यांनी ३५ वर्षांच्या पोलीससेवेत १००हून अधिक गुंडांचा खात्मा केला व चकमकफेम नावाने ते कायम प्रसिद्धीझोतात राहिले. परंतु, आता राजकारणाचं तिकिट कन्फर्म झाल्याने श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन राजकीय व सामाजिक प्रवासासाठी ते जोमाने कामाला लागले आहेत.”
 
 
“ढोंगीपणा, भपंकपणा आणि भ्रष्टाचाराने पोखरलेल्या राजकारणात नवं काही करून दाखवण्यासाठी थेट निवडणूक आखाड्यात उतरण्याच्या तयारीत असलेल्या प्रदीप शर्मा यांना आपण यानिमित्तानं दिलसे शुभेच्छा देऊया. लखनभय्या बनावट चकमक, भ्रष्टाचाराचे आरोप आदी प्रकरणांमुळे बराच काळ ते विजनवासात होते. या सर्वातून बाहेर पडलेल्या शर्मा यांनी पुन्हा ठाणे खंडणीविरोधी पथकाची कमान सांभाळली होती. त्यानंतर पहिल्याच दणक्यात खंडणीखोरीच्या प्रकरणात कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला उचलले. पण, आता खाकीत जीव रमत नाही, अशी मन की बात जाणलेल्या शर्मा यांना खादीची ओढ लागली होती. खरतरं राजकीय चकमकी घडविण्यासाठी प्रदीप शर्मा २०१४ मध्येच सज्ज झाले होते. रिपाइं आठवले गटाकडून अंधेरी पूर्व मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता परंतु, ऐनवेळी भाजपाच्या हस्तक्षेपामुळे शर्मा यांची राजकीय एन्ट्री लांबणीवर पडली.”
 
 
“पी. एस. फाऊंडेशन नावाच्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ते समाजकारणात आधीपासूनच कार्यरत आहेत. आता ते नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांचे चिरंजीव क्षितीज ठाकूर यांच्याविरोधात शिवसेनेकडून उतरतील, हे जवळपास निश्चित झाले आहे. अगदी पुढे-मागे झाले तरी अंधेरी पूर्वेतून मैदानात उतरण्यासाठी ते सज्ज आहेत. राजकारणात नशीब आजमावणारे प्रदीप शर्मा हे पहिलेच पोलीस अधिकारी नाहीत. याआधी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त एम. एन. रॉय, राज्याचे माजी पोलीस महासंचालक एम. एन. सिंहही खाकीतून खादीमय झाले आहेत. यातील प्रदीप शर्मा हे १९८३ च्या बॅचचे पोलीस अधिकारी. संघटित गुन्हेगारीला कापरं भरवणार्यां च्या या बॅचमध्ये विजय साळस्कर, प्रफुल्ल भोसले, रवींद्र आंग्रे, अरूण बोरूडे, अस्मल मोमीन, राजू पिल्लई आदी सारथी होते. या सर्वांनी माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबई, ठाण्यातील संघटित गुन्हेगारीचा सफाया केला. खाकीतले अधिकारी ऐनकेनप्रकारे कायमच चर्चेत राहिले आहेत ते वाद, विवाद आणि अंडरवर्ल्डसोबतच्या संबंधांमुळे. कोण याच्या टोळीवर तर कोण त्याच्या टोळीवर खार खातो आणि मेहरबान आहे. त्यातही खादीचे उगमस्थानही संघटित टोळ्या अन् गुन्हेगारीतूनच हे आपल्याला चांगलेच ज्ञात आहे. त्यामुळं स्वच्छ प्रतिमा आणि स्वच्छ राजकारण हा बदलेला चेहरा राजकारणात दाखल होत असलेल्या पोलीसवाल्यांमुळे पाहयला मिळेल, अशी अपेक्षा धरूया.”
 
 

 
 
“चकमकमफेम प्रदीप शर्मा मे २०२०मध्ये पोलीस सेवेतून निवृत्त होणार होते. तत्पूर्वी त्यांनी स्वेच्छेने घेतलेला निवृत्तीचा निर्णय हे राजकारणात काही नवं करण्याचं धाडस मानावं. भाकरीचा चंद्र शोधताना सामान्य माणूस राजकारणापासून कोसो दूर असला तरी राजकारणात नव काय घडतंय, याची त्याला कमालीची उत्सुकता असते. प्रशासकीय अधिकारी, अभिनेता, अभिनेत्री, वकील, डॉक्टर, अभियंता ते अगदी सामान्य कार्यकर्त्यालाही राजकीय वलय हवे असते. काही जण आयुष्याचा पूर्वाध, मध्य आणि उत्तरार्ध राजकारणात प्रवेशासाठी साधतात. प्रशासकीय सेवेतून बाहेर पडून दिल्लीचे मुख्यमंत्री बनलेले अरविंद केजरीवाल, मध्य प्रदेशच्या रायपूर जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी ओ. पी. चौधरी, छत्तीसगढचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांनीही राजकारणात उतरण्यासाठी जिल्हाधिकारी पदावर पाणी सोडले होते. १९६०च्या आयएएस बॅचचे अधिकारी यशवंत सिन्हा यांनीही १९८४मध्ये प्रशासकीय सेवेला रामराम ठोकून राजकारणात प्रवेश केला होता. ते माजी पंतप्रधान दिवंगत चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री बनले होते. माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार, मणिशंकर अय्यर, नटवर सिंह, हरदीप सिंह पुरी, राजकुमार सिंह ते अगदी अल्फोन्स कनाथनम् आदींचा प्रशासन ते राजकारण असा प्रवास आहे. प्रदीप शर्मा यांच्यासारख्या जिगरबाज आणि धडाडीच्या पोलीस अधिकार्याजमुळे देशाचं पर्यायाने राज्याचं राजकारण कूस बदलते आहे. त्यांना नव्या कारकीर्दीसाठी शुभेच्छा.”

Continue reading

पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित

व्हिक्टोरिया (सेशेल्स) येथे एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा पहिला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्त्वासाठी, विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, सागरी...

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...
Skip to content