HomeArchiveअड्डा २४७ची विनामूल्य...

अड्डा २४७ची विनामूल्य ऑनलाईन अभ्यास सामग्री

Details

 
केएचएल न्युज ब्युरो
hegdekiran17@gmail.com
 
“सध्या देशभरातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस लॉकडाऊनमुळे बंद आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून देशातील आघाडीचा तंत्रज्ञान सक्षम शिक्षण मंच अड्डा २४७ आपल्या ऑनलाईन व्यासपीठावर विद्यार्थ्यांना विनामूल्य अभ्यास सामग्री उपलब्ध करून देत आहे. अड्डा २४७ने ऑफलाईन प्रशिक्षण संस्थांच्या शिक्षकांनाही आपल्या मंचाच्या माध्यमातून विनामूल्य वर्ग देण्यासाठी आमंत्रित केले आहे.”
 
“अड्डा २४७ने आपल्या मंचाच्या माध्यमातून बँक, एसएससी, अध्यापन, संरक्षण, पीसीएस इत्यादी परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या हेतूने विविध कोचिंग संस्थांना ऑनलाईन वर्ग घेण्यासाठी आमंत्रित केले आहे. तसेच हा मंच विद्यार्थ्यांना अभ्यासाची सामग्रीदेखील विनामूल्य उपलब्ध करून देत आहे. या कठीण समयी ऑफलाईन शिकवणी केंद्रांना शैक्षणिक उपक्रमासाठी आपला मंच उपलब्ध करून देणारी या क्षेत्रातील ही एकमेव कंपनी आहे.”
 

Continue reading

खेडच्या सणघरमध्ये माजी सैनिकाचा संशयस्पद मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील सणंघर गाव! तालुक्यापासूनदूरवर शांत गाव, आजूबाजूला हिरवी झाडे-झूडपे, वस्ती बहुतेक मोरे मंडळींची, इकडेही मोरे आणि तिकडेही मोरेच! घरे मध्यम आकाराची पण प्रशस्त. या मोरे वस्तीचे विशेष म्हणजे जणू सर्वच मोरे सरकारी नोकर, कुणी पोलीस खात्यात...

केरळवासियांना काल नव्याने मिळाली ‘मोदींची गॅरंटी’!

केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल, २९ मार्च रोजी पलक्कड आणि त्रिशूरमध्ये धडाकेबाज प्रचारदौरा केला. पारंपारिक पांढरा 'मुंडू' (धोतर) आणि कुर्ता अशा मल्याळी पेहरावात आलेल्या पंतप्रधानांचे केरळमध्ये अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. ९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी...

मुंबईत १ एप्रिलपासून चालणार ‘वृक्ष संजीवनी’ अभियान

मुंबई महापालिकेमार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक ठिकाणांवरील वृक्षांच्या संवर्धनासाठी ‘वृक्ष संजीवनी’ अभियान राबविण्यात येत आहे. जागतिक वसुंधरा दिन (२२ एप्रिल) निमित्ताने १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६, या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात सध्या एकूण २९...
Skip to content