Homeमाय व्हॉईसतुमच्या माईकमध्ये व्हायरस...

तुमच्या माईकमध्ये व्हायरस घुसला असेल…

विधानसभेतील ध्वनिव्यवस्थेवरून विधानसभेत बुधवारी सकाळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांमध्ये वाग्युद्ध रंगले. परस्परांना टोमणे मारताना आता ध्वनिव्यवस्थेमधील (माईक) बिघाडाचीही एसआयटी (विशेष तपास पथक) चौकशी लावावी, अशी मागणीही केली गेली.

चौवीस तासांपूर्वी मराठा आरक्षण आंदोलनाच्या वेळी झालेल्या हिंसाचाराच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एसआयटी चौकशी जाहीर केल्याचा या वाग्युद्धाला संदर्भ होता. कॉँग्रेसचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माईकमधून चित्रविचित्र आवाज येत असल्याचे निदर्शनाला आणले. त्यामुळे तुम्ही विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करताहात, असा आरोप पटोले यांनी केला. त्यावर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी पटोले यांना उद्देशून आता नाना, तुमच्या अध्यक्षतेखालीच चौकशी लावतो, असे सांगून हंशा मिळवला.

माईक

त्यात सध्या सरकारमध्ये मंत्रिपदावर असलेले आणि आपल्या मासलेवाईक टिप्पण्यांसाठी प्रसिद्ध असलेले मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाना तुमच्या माईकमध्ये व्हायरस घुसला असेल. त्यावर सभागृहात पुन्हा हंशा उसळला.

नाना पटोले यांनी भुजबळ यांना प्रत्युत्तर देत सांगितले की, राज्यात विरोधी पक्षांमध्ये जे काही होत आहे, ते सगळे व्हायरस तुमच्याकडून म्हणजे सत्ताधारी बाकांकडूनच सोडले जात आहेत. त्यालाही सर्व सदस्यांनी दाद दिली.

मात्र, ध्वनिव्यवस्थेमधील गोंधळामुळे सुरू झालेले आरोप-प्रत्यारोप अनेक सदस्यांनी आपापल्या आसनांवर बसून आणि अध्यक्षांच्या परवानगीविनाच केल्याने ते सभागृहाच्या कामकाजाचा भाग झालेले नाहीत. पण, अखेर अध्यक्षांवर ध्वनिव्यवस्था पूर्ववत होईपर्यंत कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्याची वेळ आली. अनेकदा सभागृहात सदस्य राजकीय फायद्यासाठी हेतूपुरस्सर गोंधळ घालतात आणि त्यात सत्ताधारी तसेच विरोधी बाकांवरील सदस्यही मागे नसतात. पण, दोन्ही बाजूच्या सदस्यांच्या सहकार्यानंतरही केवळ तांत्रिक कारणासाठी कामकाज तहकूब करण्याची वेळ विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर बुधवारी आली.

Continue reading

आव्हाड, पडळकरांचे वागणे आठवीतल्या मुलांनाही लाजवणारे…

मी उद्धव ठाकरे यांना सत्ताधारी बाजूला यायचे आहे का, असे लायटर व्हेनमध्ये विचारले होते आणि तुम्ही.. तुम्ही लोकांनी त्याची हेडलाईन करून टाकली, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आपली कैफियत मांडली तर याच विषयावर उद्धव ठाकरे यांना माध्यमांनी प्रश्न...

दिनोने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया…

कामं देताना यांना दिनू मोरे दिसला नाही, पण दिनो मोरिया दिसला आणि आता त्या दिनोने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी आज विधानसभेत शिवसेना (उबाठा)वर टीका केली. कोरोना काळात कापड दुकानदार आणि हॉटेलवाल्याला...

व्हेरिफिकेशनसाठीचे अर्थपूर्ण कागद…

पडताळणी किंवा व्हेरिफिकेशनची प्रमाणित कार्यपद्धती म्हणजेच स्टँण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर अस्तित्त्वात असली तरी काही विशिष्ट कागदपत्रे दिल्यानंतर ही पडताळणी कशी वेगाने होते, हे सर्वांना माहीत आहे, अशी टिप्पणी शिवसेना (उबाठा)चे आमदार सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत केली आणि संपूर्ण सभागृह...
Skip to content