Homeकल्चर +1957पासूनच्या ‘योजना क्लासिक्स’...

1957पासूनच्या ‘योजना क्लासिक्स’ प्रकाशित!

भारत सरकारची प्रमुख प्रकाशन संस्था असलेल्या प्रकाशन विभागाने ‘योजना क्लासिक्स’ या नावाची पुस्तकांची मालिका प्रकाशित केली आहे. विभागातर्फे दर महिन्याला प्रकाशित केल्या जाणाऱ्या ‘योजना’ या विकासविषयक अंकामध्ये वर्ष 1957पासून प्रकाशित झालेल्या लेखांपैकी काही विविध संकल्पनांवर आधारित निवडक लेखांचे हे संकलन आहे. योजना मासिकातून वर्षानुवर्षे प्रसिध्द झालेल्या साहित्याचा उत्तम दर्जा आणि प्रचंड विस्तार पाहता, या संकलनासाठी मासिकाच्या सुरुवातीच्या आवृत्त्यांच्या तपकिरी मातकट आणि नाजूक पानांमधून अत्यंत सावधानतेने लेख संकलित करण्यात आले आहेत.

हे पुस्तक वाचकांना भारतीय कला, संस्कृती आणि वारसा यांचा समृध्द प्रवास घडवेल. विद्यार्थी, कला आणि संस्कृतीचे रसिक, शिक्षणतज्ञ तसेच शब्दांच्या माध्यमातून कलेचा अविष्कार होतो तेव्हा काय जादू होते याची कल्पना असलेली कोणीही व्यक्ती यांच्याकरता संग्रही ठेवलेच पाहिजे असे हे पुस्तक आहे. हे पुस्तक लवकरच सूचना भवनातील प्रकाशन विभागाच्या पुस्तकदालनात तसेच www.publicationsdivision.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

दिल्लीमध्ये सध्या सुरु असलेल्या पुस्तक जत्रा 2023 मधील प्रकाशन विभागाच्या स्टॉलला, केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांनी दिलेल्या भेटीच्या वेळी त्यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. चंद्रा यांच्यासोबत यावेळी प्रकाशन विभागाच्या महासंचालक अनुपमा भटनागर यांच्यासह विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिवांनी प्रकाशन विभागाच्या स्टॉलची सखोल माहिती घेतली आणि विभागातर्फे या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या पुस्तकांच्या समृध्द संग्रहाचे कौतुक केले. ते म्हणाले की या पुस्तकांतून भारताचा सांस्कृतिक वारसा, कला आणि संस्कृती, वैभवशाली इतिहास आणि राष्ट्रीय नेत्यांच्या उल्लेखनीय योगदानाचे दर्शन घडते.

भारतीय व्यापार प्रोत्साहन संघटना (आयटीपीओ) ने भारतीय प्रकाशन महासंघाच्या (एफआयपी) सहकार्याने 29 जुलै ते 2 ऑगस्ट 2023 या कालावधीत नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर 23 वी दिल्ली पुस्तक जत्रा आयोजित केली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाने या ठिकाणच्या हॉल क्रमांक 11 मधील स्टॉल क्रमांक 12 वर विभागाने प्रकाशित केलेली पुस्तके आणि मासिके प्रदर्शनार्थ ठेवली आहेत.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content