Homeमुंबई स्पेशलमुख्यमंत्र्यांचे निर्देश, केईएम...

मुख्यमंत्र्यांचे निर्देश, केईएम रूग्णालयातील काम १२ तासांत सुरू

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयातील सहा वॉर्डांच्या संपूर्ण नूतनीकरणाच्या कामांना युद्धपातळीवर प्रारंभ करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रूग्णालयातील व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी सोमवारी मध्यरात्री भेट दिल्यानंतर या सहा वॉर्डांचे काम युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यानुसार युद्धपातळीवर म्हणजे १२ तासांच्या आत या कामांना सुरूवात झाली.

मुख्यमंत्री शिंदे यांनी रुग्णालयांमधील विविध व्यवस्थांची तसेच विभागांची पाहणी करुन समाधान व्यक्त केले होते. तसेच सहा वॉर्डांचे नूतनीकरण तातडीने सुरू करुन ही कामे पूर्णत्वास नेण्याच्या सूचनाही भेटीदरम्यान केल्या होत्या. या आदेशानुसार तत्काळ याठिकाणी काम सुरू करण्याचे निर्देश पालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी दिले आणि या सहाही वॉर्डमधील नूतनीकरण सुरू झाले.

या सहा वॉर्डच्या कामांमध्ये स्थापत्य, विद्युत, नवीन फर्निचर आणि वैद्यकीय प्राणवायू वाहिनी (मेडिकल ऑक्सिजन पाईपलाईन) यासारखी कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी बांधकामाच्या किरकोळ कामांना काल सुरूवात झाली. ही कामे वेगाने व्हावीत मात्र, त्याचवेळी त्यांचा रुग्णांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीने दिवसरात्र काम करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी केल्या आहेत. यामध्ये वॉर्ड क्रमांक ४, ४अ, ६, ७, ११ आणि १२ या सहा वॉर्डचा समावेश आहे. याआधी या प्रत्येक वॉर्डचे काम स्वतंत्रपणे करण्याचे नियोजित होते. तथापि, रुग्णशय्या पूर्ण क्षमतेने लवकरात लवकर उपयोगात याव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार आता संपूर्ण सहा वॉर्डचे काम एकाचवेळी हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.

या प्रत्येक वॉर्डमध्ये ६० ते ७० इतकी रूग्णसेवा देण्याची क्षमता आहे. नूतनीकरणानंतर या सहा वॉर्डच्या उपलब्धततेमुळे सुमारे ४२० रूग्णांना उपचार देण्याची वाढीव क्षमता निर्माण होणे शक्य होईल. परिणामी रूग्णालयाच्या सुविधांमध्ये भर पडतानाच अधिक गुणवत्तापूर्ण सुविधा रूग्णांसाठी उपलब्ध करून देता येतील, असेही ते म्हणाले.

Continue reading

ट्विटने युद्ध थांबवता येत नाही! इराणने ट्रम्पना सुनावले!!

युद्ध सुरू करणे सोपे आहे. ट्विटने ते थांबवता येत नाही. अमेरिकेला याची किंमत मोजावीच लागेल, अशा शब्दांत इराणचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अली लारीजानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काल रात्री सुनावले. कालच इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह मोजतबा खामेनेई...

तेलसंकटावर अमित शाह समितीचा उतारा! भारतासाठी ‘होर्मूझ’ मोकळा!

आखातात सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या तेलसंकटावर मार्ग काढण्याकरीता केंद्र सरकारने गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी या समितीचे अन्य दोन सदस्य आहे....

गोळीबारात थोडक्यात बचावले डॉ. फारूक अब्दुल्ला!

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला काल रात्री झालेल्या गोळीबारात थोडक्यात बचावले. जम्मूमध्ये हॉटेल सोहेल पार्क येथील एका लग्नसमारंभातून बाहेर पडताना कमल सिंह जम्वाल नावाच्या एका इसमाने पाठीमागून डॉ. अब्दुल्ला यांच्या डोक्यात गोळी...
Skip to content