Homeचिट चॅटईश्वरसेवा समजून काम...

ईश्वरसेवा समजून काम करूया – अविनाश दौंड

महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा देताना जगाला हेवा वाटेल असा पुरोगामी महाराष्ट्र घडविणारे थोर समाजसुधारक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०५ हुतात्मे आणि जगभरातील लक्षावधी कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी शाहिद झालेले कामगार कार्यकर्ते, कामगार नेते यांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन करून बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड यांनी कोरोनाच्या या काळात साधनसामुग्रीचा तुटवडा असला तरी रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा समजून सर्वोत्तम सेवा द्यावी, असे आवाहन सरकारी कर्मचाऱ्यांना केले आहे.

कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत देशस्थिती अतिशय भयावह झाली असून देशात आरोग्य आणिबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात रोज ६५ ते ७० हजार नवीन रुग्ण आढळत असून दुर्दैवाने रोज ५०० नागरिक बळी पडत आहेत. मुंबईत तर उद्रेक झाला असून रुग्णालयात बेड, ऑॅक्सिजन, इंजेक्शन, लस यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या १६ महिन्यांत कोरोनाशी लढताना हजारो शासकीय कर्मचारी, प्रामुख्याने आरोग्य सेवक, पोलीस, वाहक, चालक यांना जीव गमवावा लागला आहे. त्यांच्या वारसांना तातडीने ५० लक्ष विमा रक्कम आणि अनुकंपा तत्त्वावर नोकरी देणे हे शासनाचे कर्तव्य आहे, असे ते म्हणाले.

कर्मचाऱ्यांच्या अनेक महत्त्वाच्या मागण्या शासन दरबारी बराच काळ प्रलंबित आहेत आणि पुढील काळात त्यासाठी संघर्षसुद्धा करावा लागणार आहे. महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त ज्येष्ठ नेते र. ग. कर्णिक यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार आजच्या कठीण काळात कर्मचाऱ्यांनी शासनाला तन, मन आणि धनाने सहकार्य केले पाहिजे. यापुढे समाज माध्यमांवर व्यक्त होताना आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. संपूर्ण जिल्ह्यात एकमेकांशी कायम संपर्कात राहून अभावग्रस्तांना सर्वतोपरी मदत करावी. याकामी राहत्या ठिकाणीसुद्धा पुढाकार घ्यावा. तसेच अनेक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना कोरोना होऊन ते बरे झाले आहेत. अशांनी लस घेण्यापूर्वी प्लाझ्मा द्यावा देण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही दौंड यांनी केले आहे.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content