Homeटॉप स्टोरीराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार...

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा लांबणीवर?

येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपापल्या कार्यक्षेत्रातल्या युतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याची क्षमता असलेल्या व्यक्तींनाच मंत्रिपद देण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नव्याने लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसत आहे.

भाजपा नेते अमित शाह यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री व भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत, येणाऱ्या विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीत आपापल्या मतदारसंघातील उमेदवाराला निवडून आणू शकणाऱ्या आमदारालाच मंत्रीपदाचे बळ द्यावे, असे निश्चित करण्यात आले. या निकषामुळे भाजपा तसेच शिवसेनेच्या सध्याच्या काही मंत्र्यांना नारळ मिळण्याची दाट शक्यता आहे. भाजपाच्या मंत्र्यांना नारळ मिळाला तरी हायकमांडसमोर त्यांचे काही चालत नाही. मात्र शिवसेनेचे तसे नाही. उद्धव ठाकरेंना बाजूला करून पक्ष शिंदे यांच्या दावणीला बांधण्याच्या प्रक्रियेत शिंदेंसोबत असलेले जे काही मंत्री सध्या मंत्रिमंडळात आहेत, त्यांना बाजूला सारल्यास पक्षात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदेंकडून हा कथित प्रस्तावित विस्तार लांबणीवर टाकला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, संदीपान भुमरे, संजय राठोड आणि अब्दुल सत्तार हे मंत्री या निकषात बसत नाहीत. किंबहुना त्यांच्यामुळे मंत्रिमंडळाची छबीही खराब होत आहे. गुलाबराव पाटील यांच्याकडून ग्रामीण, शहरी भागातील पाणीपुरवठ्याची कामे अपेक्षेनुसार झाली नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात सरकारविषयी नाराजी आहे. तानाजी सावंत यांनी आरोग्य खात्यात कोणतीही महत्त्वाची कामगिरी बजावली नाही. शिवाय प्रत्येक जिल्ह्यात स्वत:चे ‘खासगी सचिव’ही नेमले आहेत. संजय राठोडविरोधात भाजपा समर्थक औषधे विक्रेत्यांच्या तक्रारी आहेत. एका युवतीच्या आत्महत्त्या प्रकरणानेही त्यांची प्रतीमा वादात राहिली आहे. अब्दुल सत्तार यांच्या बेताल वक्तव्यांमुळे सरकार नेहमीच अडचणीत आले आहे. केंद्राच्या कृषि योजनांचा लाभ खालपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यातही ते अपयशी ठरले आहेत. संदीपान भुमरे यांची कामगिरीही बऱ्यापैकी प्रभावहीन राहिली आहे. त्यामुळे हे पाच मंत्री भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या रडारवर आहेत. मात्र, शिवसेनेतल्या उठावात याच पाच मंत्र्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना खंबीरपणे साथ दिल्याने शिंदेंच्या समोर अडचण निर्माण झाली आहे. यावर तोडगा कसा काढायचा आणि त्यानंतर विस्तार कसा करायचा, हा प्रश्न त्यांना भेडसावत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content