Homeहेल्थ इज वेल्थहत्तीरोगाच्या निर्मूलनाचे लक्ष्य...

हत्तीरोगाच्या निर्मूलनाचे लक्ष्य भारत 3 वर्षांआधीच गाठणार?

मिशन मोड, बहु भागीदार, बहु क्षेत्र लक्ष्यित मोहिमेद्वारे जागतिक लक्ष्यापेक्षा तीन वर्षे आधी म्हणजेच 2027पर्यंत हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलेरियासिस) या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे, असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सांगितले.

डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे वार्षिक राष्ट्रव्यापी व्यापक औषध सेवन (एमडीए) उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचे नुकतेच उद्घाटन झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते. उद्घाटनप्रसंगी आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रो. एस. पी. सिंह बघेल हेदेखील उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, जन भागीदारी, ‘सरकारचा संपूर्ण सहभाग’ आणि ‘संपूर्ण समाजाचा सक्रिय सहभाग’ या दृष्टिकोनाद्वारे आपण हा आजार देशातून नष्ट करू शकू, असा विश्वास डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला. 10 ऑगस्ट 2023 पासून सुरू होणारा या उपक्रमाचा दुसरा टप्पा या आजाराचा प्रादुर्भाव जास्त असणाऱ्या 9 राज्यांमधील (आसाम, बिहार, छत्तीसगड, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, ओदिशा, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश) 81 जिल्ह्यात राबवला जाणार आहे.

हा आजार आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केवळ औषधे घेण्यापुरते मर्यादित नसावेत, तर डासांच्या माध्यमातून याचा प्रसार रोखण्यासाठीही पावले उचलली पाहिजेत, यावर डॉ. मांडविया यांनी यावर भर दिला. त्याशिवाय आपले ध्येय साध्य करण्याच्या मार्गावरील प्रगती खुपच मर्यादित राहील. असेही ते म्हणाले.

आरोग्य संपन्न  राष्ट्र सुनिश्चित करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारमधील समन्वय वाढवण्यावरही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी भर दिला.

याप्रसंगी डॉ. मांडविया यांनी डेंग्यू ताप 2023 आणि चिकुनगुनिया तापाच्या चिकित्सा  व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content