Homeडेली पल्सगोवा-मुंबई महामार्गाचे कामही...

गोवा-मुंबई महामार्गाचे कामही येत्या 7 ते 8 महिन्यांत पूर्ण?

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल गोव्यामधील न्यू झुआरी पुलाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. हा पूल मडगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गावरील कोर्टालीम गावात झुआरी नदीवर असून, राज्यातील वाहतूक कोंडी कमी करणे, हे या पुलाचे उद्दिष्ट आहे. गोवा-मुंबई महामार्गाचे कामही येत्या 7 ते 8 महिन्यांत पूर्ण होईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

पहिल्या टप्प्यामध्ये, 8 मार्गिकांच्या स्टेड केबल पुलाच्या 4 मार्गिकांच्या उजवीकडील कॉरिडॉरचे (विभागाचे) उद्घाटन करण्यात आले आहे. 2530 कोटी रुपयांच्या या प्रकल्पात नवीन पूल आणि बांबोलीम ते वेर्णा या मार्गांचा समावेश आहे आणि एकूण प्रकल्पाची लांबी 13.20 किमी आहे.

या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी, एक भव्य आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात साकारत आहे. त्यांनी दिवंगत मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री मनोहर पर्रिकर यांना, मांडवी पूल आणि झुआरी नदीवरील नवीन केबल पूल या दोन्हींचे शिल्पकार म्हणून श्रेय दिले. या प्रकल्पाच्या बांधकामाचा अलीकडचा वेगही केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय देशभरात पूल बांधण्यासाठी वापरत असलेल्या नवीन तंत्रज्ञानाचा पुरावा असल्याचे गडकरी यांनी नमूद केले.

केंद्र आणि राज्य अशी दोन्ही सरकारांनी नव्या झुआरी पुलावर फिरते उपाहारगृह साकारलेले पाहण्याचा निश्चय केला आहे. जगभरातून पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या या सुंदर राज्यात बांधलेल्या या नव्या पुलावर असे पहिलेच फिरते उपाहारगृह असणे राज्याच्या सौंदर्याला साजेसे आहे. वर्ष 2024पर्यंत देशातील रस्त्यांचा दर्जा जागतिक पातळीवरील सर्वोत्तम रस्त्यांच्या दर्जाइतका उंचावण्याचा सरकारचा मानस आहे, असेही केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले.

गोव्याचा सकल विकास साध्य करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कार्यरत असल्याचे केंद्रीय पर्यटन आणि बंदरे, जहाज व जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी यावेळी सांगितले. सामान्य गोवेकरांपुढील वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यात नवा झुआरी पूल महत्त्वाची भूमिका बजावेल, असे ते म्हणाले.

राष्ट्रीय महामार्गांशी व बंदरांशी जोडण्यात सुधारणा करण्याकरीता राज्याला मार्गदर्शन केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आभार मानले. नव्या झुआरी पुलावरील फिरते उपाहारगृह पर्यटकांसाठी एक आकर्षण ठरेल, असे ते म्हणाले. नव्या पुलामुळे उत्तर व दक्षिण गोवा यांच्यातील वाहतूक सुलभ होईल, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी नव्या पुलाभोवती प्रकाश व ध्वनीचा खेळ उभारण्याची आणि राज्यातील बंदर, विमानतळ व रेल्वेला जोडणाऱ्या वर्तुळाकार मार्गाची आग्रही मागणी केली.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एकात्मिक कार्य व्यवस्थापनासाठी मोबाईल एप्लिकेशन प्रणालीची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला गोवा सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री निलेश कब्राल, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, लोकसभा खासदार फ्रान्सिस्को सारडिन्हा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content