Homeटॉप स्टोरीखरी शिवसेना कोणाची...

खरी शिवसेना कोणाची यासाठी पुन्हा न्यायालयीन फेरा?

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने काल शिवसेनेच्या १६ आमदारांच्या निलंबनाच्या मुद्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपवला असला तरी खरी शिवसेना कोणती हे ठरविण्याची प्रक्रिया पुन्हा न्यायालयाच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचप्रमाणे न्यायालयाने निर्णयासाठी कोणताही कालावधी निश्चित केलेला नाही. यामुळेही या सर्व प्रक्रियेत या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दाच लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

शिवसेना

सत्तासंघर्षाच्या निकालादरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने काल आमदारांच्या निलबंनाच्या मुद्यावर विधानसभा अध्यक्षांनी म्हणजेच राहुल नार्वेकर यांना निर्णय घ्यायला सांगितले आहे. त्यानुसार, विधानसभा अध्यक्षांना हा निर्णय घेण्यापूर्वी खरी शिवसेना कोणाची हे निश्चित करावे लागणार आहे. याकरीता निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या पक्षाची मूळ घटना, त्यातील अटी आणि नियम तसेच पक्षाच्या नेतृत्त्वाची रचना विचारात घ्यावी लागेल. शिवसेनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उद्धव ठाकरे, असा दोघांनीही दावा केला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष तसेच पक्षाचे चिन्ह शिंदे यांच्या गटाकडे दिले आहे. ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याला आव्हान दिले गेले आहे. न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली नसली तरी यावर अंतीम निर्णय दिलेला नाही. त्यामुळे दोन्ही गटांकडून त्यांचे वेगवेगळे दावे केले जातील. त्यामुळे खरी शिवसेना ठरविताना अध्यक्ष नार्वेकर यांचे कौशल्य पणाला लागणार आहे. त्यानंतरही अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेतला तरी दुसरा गट तो मान्य करणार नाही आणि पुन्हा हे प्रकरण न्यायालयाच्या दारात जाणार हे निश्चित मानले जात आहे.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content