Homeटॉप स्टोरीविधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत...

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दगाफटका?

राज्य विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दगाफटका होण्याची शक्यता लक्षात घेता ही निवडणूक गुप्त मतदानाने न घेता आवाजी मतदानाने घेण्याचे डावपेच सत्ताधारी महाविकास आघाडीकडून आखले जात असून काँग्रेसने त्यासाठी आग्रह धरला असल्याचे कळते.

साधारण १० महिन्यांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही सरकारकडे विधानसभा अध्यक्ष केव्हा निवडणार, याची विचारणा केली होती. परंतु दगाफटका होण्याच्या दृष्टीने सतेतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक टाळली. कोरोनाचे कारण याकरीता पुढे करण्यात आले. या काळात विधिमंडळाची दोन अधिवेशने झाली. काँग्रेसने दोन्ही वेळा विधासभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आग्रह धरला. परंतु त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्या. विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड करताना सत्ताधारी पक्षाचा उमेदवार पडला तर सरकार अल्पमतात असल्याचे दिसून येते व सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहत नाही. त्यामुळेच ही निवडणूक सारखी टाळली जात आहे.

दोन दिवसांपूर्वीच तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेसमुक्त विरोधी पक्षांची आघाडी निर्माण करण्याचा मनोदय जाहीर करताना काँग्रेस खिजगणतीत नसल्याचे सूचित केले होते. त्यामुळे बिथरलेल्या काँग्रेस नेत्यांनी येत्या हिवाळी अधिवेशनातच विधानसभेचा अध्यक्ष निवडण्याचा तसेच ही निवडणूक आवाजी मतदानाने करण्याची आणि उमेदवार काँग्रेसचाच असेल असे जाहीर करून टाकले.

विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड या महिन्यात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनातच होईल व अध्यक्ष काँग्रेस पक्षाचाच होईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतःच आज स्पष्ट केले.

कोरोनामुळे आतापर्यंत झालेल्या अधिवेशनाचा कालावधी कमी होता. अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेसाठी तीन दिवसांची कालावधी लागतो. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवड आतापर्यंत झाली नाही. हिवाळी अधिवेशनात मात्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड होईल व ती आवाजी मतदानाने होईल. आवाजी मतदानाने निवड होण्याची पद्धत देशभर सर्वच राज्यात आहे. त्यात काही गैर नाही. विधानसभेने त्यांच्या नियमावलीत बदल केलेला आहे. महाराष्ट्रातही विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवड याच पद्धतीने होत असते. त्यामुळे यावर कोणी आक्षेप घेण्याचे काही कारण नाही, असेही ते म्हणाले.

अमरावती दंगलीप्रकरणी फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या आरोपासंदर्भात पटोले म्हणाले की, अमरावती दंगलीत भाजपाचे आमदार व नेतेच सक्रीय होते. भाजपाच्या नेत्यांनीच चिथावणी देणारी विधाने केली. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर अमरावती दंगलीचे खापर फोडणे चुकीचे आहे. राहुल गांधी यांची बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे व असा प्रयत्न भाजपाकडून सातत्याने होत आहे. राहुल गांधी यांच्याविषयी बोलण्याचा फडणवीस यांना नैतिक अधिकार नाही. गांधी कुटुंबाने देशासाठी त्याग केला आहे, बलिदान दिले आहे. भाजपाने देशासाठी काय केले?

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content