Homeडेली पल्सउद्धवजी.. तेव्हा तुमची...

उद्धवजी.. तेव्हा तुमची नैतिकता कोणत्या डब्यात बंद होती?

उद्धव ठाकरे यांनी आपण नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. मग भारतीय जनता पार्टीबरोबर निवडणूक लढवून काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर सरकार बनवताना आपण आपली नैतिकता कोणत्या डब्यात बंद केली होती, असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल एका पत्रकार परिषदेत केला.

उद्धव ठाकरे यांनी खुर्चीकरीता विचार सोडला तर एकनाथ शिंदे यांनी विचारांसाठी खुर्ची सोडली. ते सत्तेत होते, मंत्री होते. ते सत्ता सोडून विरोधकांकडे म्हणजे आमच्याकडे आले. हे लक्षात आल्यानंतर ठाकरे यांना कळलं की, आपल्याकडे संख्याबळ नाही, आपण हरणार आहोत. आपले लोक आपल्याला सोडून गेले आहेत. त्यामुळे लाजेपोटी, भीतीपोटी अविश्वासाच्या ठरावाला सामोरे न जाता त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, असेही फडणवीस म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे लोकशाहीचा, लोकमताचा विजय झाला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या मनसुब्यावर पाणी फिरले. उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्याचवेळेला अपात्र सदस्यांच्या अपात्रतेच्या विषयावर निर्णय घेण्याचे सर्व अधिकार अध्यक्षांकडे दिले. हे प्रकरण इतके असाधारण नाही की आम्ही त्यांच्या अधिकारात हस्तक्षेप करावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने जे निर्णय घेतले आहेत, तसे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार त्यांना आहे. ते स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात. त्यांना आम्ही कोणत्याही पद्धतीची बाधा आणू शकत नाही. एकाच पक्षावर दोन किंवा त्यापेक्षा अधिक गटांनी दावा केल्यानंतर अध्यक्षांना याचा अधिकार आहे की ते राजकीय पक्ष कोणता आणि कोणाकडे आहे, हे निश्चित करू शकतात. राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी निमंत्रित केले हे योग्यच आहे,  संवैधानिकच आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

घटनाबाह्य बोलणारे झाले कालबाह्य – एकनाथ शिंदे

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आमचे सरकार घटनाबाह्य म्हणणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने चांगली चपराक बसली असून ते आता कालबाह्य झाले आहेत. सदस्यांच्या अपात्रतेबद्दल अध्यक्ष मेरीटप्रमाणे निर्णय करतील.

आजही हे लोक म्हणतात की, आमच्याच पक्षाचा व्हिप लागणार… माणसे किती आहेत? तुम्ही धनुष्यबाण गहाण ठेवला. आम्ही तो वाचवला. त्याला वाचवण्याचं काम आम्ही केलं आणि निवडणूक आयोगाने आम्हाला शिवसेना हे पक्षाचे नाव तसेच धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह दिले आहे. त्यामुळे फक्त लोकांची दिशाभूल करण्यासाठी हे शिवसेना, शिवसेना करत आहेत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content