Homeब्लॅक अँड व्हाईटआरे कॉलनीतील फिल्टरपाडा...

आरे कॉलनीतील फिल्टरपाडा ‘फिल्टर’ तरी होणार कधी?

मुंबईतल्या आरे कॉलनीच्या टोकाला (पवईच्या बाजूने) फिल्टरपाडा सर्कल परिसरात नेहमीच रिक्षा व खासगी मोटारगाड्या पार्क केल्या जात असतात. गेली अनेक वर्षे येथे वाहतुकीला अडथळा न करता गाड्यांचे पार्किंग केले जाते. कारण उघड आहे, फिल्टरपाड्यात चाळीत राहणाऱ्या गरिबांकडे घरासमोर गाडी पार्क करण्याइतपत मोकळी जागाच नसते. म्हणून या सर्कल परिसरात सर्वचजण गाड्या पार्क करतात. परंतु गेल्या वर्षभरापासून या रिक्षा व मोटारगाड्यांधारकांकडून जबरदस्तीने पार्किंगचे पैसे वसूल केले जात आहेत.

काही उनाड मुलांना हाताशी धरून दोन-तीन मुस्लिम महिला हा उद्योग करीत असतात, अशी माहिती हाती आली आहे. या महिला इंस्टाग्रामवर विविध प्रकारची रिल्स करून दाखवत असतात. पार्किंगचे दर मासिक 500/600 रुपये असून ते देण्यास नकार देणाऱ्या रिक्षाचे नुकसान केले जाते. कधी टायर्स फाडले जातात, कधी पत्र्यावर हॉकी स्टिक मारून पोक काढली जातात. अवघ्या 15 दिवसांपूर्वी तर येथील गुंडानी पार्किंगचे पैसे देत नाहीत म्हणून एक खासगी मोटारगाडी खुलेआम जाळून टाकली. खरेतर हा अतिशय गंभीर गुन्हा आहे. परंतु गुंडाच्या दहशतीमुळे कुणीही या अपप्रकारविरुद्ध तक्रार करण्यास धजावत नसल्याचे त्या परिसरात फेरफटका मारला असता समजले. इतकेच नव्हे तर सहा महिन्यांपूर्वीही एक गाडी अशीच जाळून टाकण्यात आली होती.

या परिसरात राहणारा फिल्टरपाड्यातील शाहरुख आणि गुड्डू नावाचे कथित गुंड हा प्रकार करतात, असे दबक्या आवाजात बोलले जाते. या दोघांना परिसरातील उनाड मुले साथ देतात असे समजले. तसेच या परिसरात अमली पदार्थांचाही खुलेआम धंदा केला जातो. फिल्टरपाड्यातील काही घरात अंमली पदार्थ, प्राणघातक शस्त्रे जसे तलवारी, सायकल चेन्स, तसेच घोडेही बाळगणारे लोक आहेत. या सर्व असामाजिक गोष्टी पवई व वनराई पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना चांगल्याप्रकारे माहित आहे.

खरेतर अंमली पदार्थाच्या आरोपाखली अटक केली तर लवकर सुटका व जामीनही मिळत नाही. पण वनराईने पकडलेल्या संशयितांना मात्र जामीन त्वरित मिळतो. हा जो कोणी शाहरुख आहे तोही असाच बाहेर आहे. त्याचे काम एकच. धमक्या देणे व पैसे उकळणे. कुणी दिले नाहीत तर भोसकणे आणि हे सर्व प्रकार खुलेआम होत असतात. मागे या वस्तीत खुलेआम तलवारबाजी करणारा गुंड होता. त्याला राग आला की घरातील तलवार घेऊन तो बाहेर यायचा व दिसेल त्याच्यावर वार करायचा. सुमारे 9/10 जणांच्या या गुंड टोळीने सर्व फिल्टरपाड्यास जेरीस आणले असून काही दिवस हा संपूर्ण परिसर गुन्हा अन्वेषण खात्याच्या अधिकाऱ्यांच्या हाती द्यावा, अशी मागणी येथील रहिवाशांनी बोलताना केली. याच परिसरातील पठाणवाडीत नेहमीच काश्मीरमधील काही लोकांची येजा असते, असेही समजले.

छायाचित्रः प्रवीण वराडकर

Continue reading

बिहारमध्ये विरोधकांचे ‘जंगलराज’ तर सत्ताधाऱ्यांचे काय ‘मंगलराज’?

"Criticism may not agreeable but its necessary. It fulfils the same function as pain in the human body. It calls attention to an unhealthy state of things" असंच काहीस राजकारणात सत्तारूढ पक्ष व विरोधी पक्ष यांचे नाते असावे, असं...

ठाणे.. ती गाडी आणि त्यावरचे स्टिकर.. गौडबंगाल तर नाही ना!

नेहमीप्रमाणे ठाणे शहरातील कोर्टनाका परिसरात फेरफटका मारून ढोकाळी नाक्यानजिक असलेल्या घरी जायला बस घेतली. तुम्ही विचाराल की तुम्ही दररोज किंवा आलटूनपालटून कोर्टनाक्याला का जाता? उत्तर सोपं आहे. राजकीय नेत्यांच्या पंटर्सची या परिसरात उठबस असते. जिल्हाधिकारी कार्यालय आहे. समोरच जिल्हा...

आता कळेलच धडधाकट कोण आणि कुबड्यांची गरज कुणाला?

आजच्या दैनिक लोकसत्तेच्या अग्रलेखाचा मथळा इतका बोलका आहे की, त्यावर काही लिहिणे अन्यायकारक ठरेल! आपल्या देशात हे नेहमीच घडत आलेले आहे व पुढेही घडणार आहे. राष्ट्रीय पक्ष मग तो भारतीय जनता पक्ष (भाजप) असो वा काँग्रेस, त्यांनी नेहमीच असे...
Skip to content