Homeचिट चॅटबिग बॉसमध्ये आज...

बिग बॉसमध्ये आज जय सोनालीबद्दल काय सांगणार?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जय आणि स्नेहा बरीच मज्जामस्ती करतात, खेळाबद्दलही बोलतात, घरामध्ये कोण कसं वागत आहे, त्याबद्दलही त्यांची चर्चा होतच असते. आजही जय स्नेहाला सोनालीबद्दल काहीतरी सांगताना दिसणार आहे.

जय स्नेहाला म्हणतो, सोनाली जरी विरुद्ध टीममध्ये असली तरीही मी सोनालीला कधीच सांगत नाही की, विशालसोबत नको, माझ्यासोबत खेळ. तिने आजही मला सांगावं. मी तिला फक्त एकच सांगतो की, सोनाली तू दिसत नाहीये, मागे आहेस.. मग ते ग्रुपमध्ये असो वा गेममध्ये असो. स्वत:वर विश्वास पाहिजे. कोई रहे ना रहे साथ…हम खंबीर है.. असं पाहिजे. म्हणून मी डॉक्टरला (उत्कर्षला) म्हणतो- आपण दोघे जरी असलो ना.. तरी आपण भरपूर आहोत. विचार नका करू चार जणच पाहिजे..

बिग बॉस

स्नेहा म्हणते- “तसाच मीही विचार करते. मी एकटी जरी असले ना.. तरी भरपूर आहे. त्यावर जय म्हणतो, मलाही काऊंट करत जा तुझ्यासोबत. मला टीममध्ये घेशील तुझ्या? अशी का करतेस? नकोय का तुला मी तुझ्या टीममध्ये…?” स्नेहा म्हणते, माझी टीमच नाहीये… जय म्हणतो.. आपण टीम बनून जाऊ…

बिग बॉस

 

बिग बॉसच्या घरात सदस्यांची बरीच धम्मालमस्ती सुरू असते. कधी गाण्यांच्या भेंड्या, कधी डमशराज तर कधी गायनाची मैफलही रंगते. आज उत्कर्ष, गायत्री, मीरा आणि तृप्तीताईंची घरात धम्मालमस्ती सुरू आहे.

गायत्री तृप्तीताईंना म्हणते- सासूबाई हे पीठ ओतताना सांडत आहे माझ्याकडून… त्यावर ताई म्हणतात, ठीक आहे शिकते आहे न तू, सांडू दे… गायत्री म्हणते “तुम्हीसुध्दा सांडता आहात सासूबाई. तृप्तीताई म्हणतात- मी तुला एक नियम शिकवते.. म्हणजे पद्धत… गायत्री म्हणते, संचालकाला नियम बनवणे allowed नसते… आणि त्या दोघींचे मजेदार संभाषण सुरू होते.

उत्कर्ष त्यावर कविता बनवतो.. “सासू-सुनेचे भांडण… सुनबाई फटकळ तोंडानं, सासू-सुनेला मारायला धावते… कडाडून सूनबाई सासुला चावते… बघूया आता अजून कायकाय घडतं ते.. आज रात्री.. बिग बॉस मराठीत… कलर्स मराठीवर..

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content