Homeटॉप स्टोरीशरद पवार यांच्या...

शरद पवार यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेणार!

शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून त्यांच्याबद्दल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षाव्यवस्थेतही वाढ करण्याच्या सूचना आपण पोलिसांना दिल्या आहेत, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.

शरद पवार यांना सोशल मिडियावर ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार’ अशी धमकी आल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. शरद पवार यांना जीवे मारण्याच्या धमकी आल्यानंतर ट्विटरवरून मुख्यमंत्री शिंदे व्यक्त झाले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरून आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे, तपासाच्या सूचना दिल्या आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले वातावरण बिघडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काही लोकांकडून सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यापासून काही लोक बिथरले आहेत. त्यातून महाराष्ट्रातले वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. औरंगजेब, टिपू सुलतानचे उदात्तीकरण करून धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. आपल्या राजकारणासाठी महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे कारस्थान हाणून पाडले जाईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

पवार

ट्विटर हॅण्डलची शहानिशा करा – देवेंद्र फडणवीस

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ज्या ट्विटर हॅण्डलवरुन धमकी आली, त्याची शहानिशा करुन कारवाई करा, असा आदेश राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिला आहे. शरद पवार यांना धमकी आल्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त फणसाळकर यांनी फडणवीस यांची त्यांच्या निवासास्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत त्यांनी या धमकी प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर फडणवीस यांनी संबंधित ट्विटर हॅण्डलची शहानिशा करुन कारवाई करण्याचे आदेश दिले.

महाराष्ट्राच्या राजकारणात एक उच्च परंपरा आहे. राजकीय पातळीवर मतभेद असले तरी मनभेद नाहीत. कोणत्याही नेत्याला धमक्या देणे किंवा समाजमाध्यमांवर व्यक्त होताना सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणे, हे खपवून घेणार नाही. अशा प्रकरणात कायद्यानुसार पोलीस निश्चितपणे कारवाई करतील, असे फडणवीस म्हणाले.

सुप्रिया सुळेंनी घेतली आयुक्तांची भेट

शरद पवार यांना सोशल मिडियावर ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार’ अशी धमकी आल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने आज मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेत तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली.

यावेळी सोशल मिडियावर आलेल्या त्या धमकीच्या स्क्रिनशॉटची झेरॉक्स पोलीस आयुक्तांना देण्यात आली. यावेळी मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, राखी जाधव, प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पवार

धमकीमागचा मास्टरमाईंड शोधावा – अजित पवार

शरद पवार यांना देण्यात आलेली धमकी, हे गंभीर प्रकरण आहे. केंद्र आणि राज्य सरकारने या धमकीची गांभीर्याने दखल घेऊन आरोपींना तातडीने गजाआड करावे. धमकीमागचा खरा मास्टरमाईंड शोधावा. अशा विचारांच्या समाजविघातक शक्तींना वेळीच रोखावे, हेच राज्याच्या हिताचे असेल, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.

शरद पवार यांचे संरक्षण करण्यास महाराष्ट्रातील जनता समर्थ आहे. परंतु डॉ. दाभोळकरांची हत्त्या करणाऱ्या शक्ती राज्यात पुन्हा सक्रीय झाल्या आहेत, ही बाब अधिक चिंताजनक आहे. निवडणुका जवळ येऊ लागल्याने यापुढे जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषावादाचे असे मुद्दे उपस्थित करुन समाजात द्वेष निर्माण करण्याचे, दुही माजवण्याचे, मतांच्या ध्रुवीकरणाचे प्रयत्न होतील, असेही ते म्हणाले.

पवार

माझा कायदा-सुव्यवस्थेवर विश्वास – शरद पवार

कोणत्याही प्रश्नावर मत देण्याचा अधिकार या जनतेच्या प्रत्येक नागरिकाला आहे. आणि असे असताना धमक्या देऊन कुणाचा आवाज बंद कराल, असे वाटत असेल तर हा गैरसमज आहे. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर माझा पूर्णपणे विश्वास आहे, त्यामुळे मला चिंता नाही. पण ज्यांच्या हातात राज्यातील सूत्रे आहेत, त्यांना जबाबदारी टाळता येत नाही, अशी प्रतिक्रिया स्वतः शरद पवार यांनी दिली आहे.

पवार यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ

दरम्यान, शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या पुण्यातील घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबईतही त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा ठेवण्यात आला आहे, असे समजते.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content