Homeपब्लिक फिगरआपली जनतेशी बांधिलकी...

आपली जनतेशी बांधिलकी – जयंत पाटील

सत्तेत आलो म्हणजे हातावर घडी घालून बसू नका.. आपली जनतेशी बांधिलकी आहे ती अधिकाधिक मजबूत करण्याचे काम करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भंडारा जिल्हयातील साकोली विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेताना केले.

राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍याचा आजचा तिसरा दिवस असून भंडारा जिल्हयातील साकोली विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीने दौर्‍याची सुरुवात झाली. आजही भंडारा येथे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करून लोकांना शरद पवारसाहेबांच्या विचारांकडे आकर्षित करण्याचे काम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावे, असे मार्गदर्शनही जयंत पाटील यांनी केले.

राष्ट्रवादीकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. दूर्गम भागातही लोक रात्री उशिरापर्यंत आढावा बैठकांना उपस्थित राहत आहेत. या परिवाराचा आणखी विस्तार करायचा आहे म्हणून हा राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भंडारा भागातील लोकांसाठी राष्ट्रवादीने असंख्य कामे केली आहेत. खासदार प्रफुल पटेल यांनी धानाला जास्तीची किंमत मिळवून दिली आहे. मागे झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई राष्ट्रवादीने शासनाच्या माध्यमातून मिळवून दिली याची आठवण पाटील यांनी करुन दिली.

यावेळी जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुधे, आमदार राजूभाऊ कारेमोरे, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी मंत्री विलासभाऊ शृंगारपवार, माजी आमदार राजू जैन, विदर्भ दौरा समन्वयक प्रवीण कुंटे पाटील, पक्षाचे नेते धनंजय दलाल, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राजेंद्र बढिये आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content