Homeमुंबई स्पेशलफिल्टरपाड्यातल्या नाल्याचे पाणी...

फिल्टरपाड्यातल्या नाल्याचे पाणी मिळते ८० रूपये बादली!

मुंबईतील गोरेगाव नजीकच्या आरे कॉलनीच्या फिल्टरपाड्यातून एक नाला वाहतो. तो पवईकडे जातो. हा नाला वाहत असताना आपल्याबरोबर गाळ आणि घाण नेत असतो. पण या नाल्याच्या एका टोकाला एका महिला नाला अडवून त्यातील पाणी अर्थात घाणीसह एका खड्ड्यात जमा करून ठेवते, अशी माहिती हाती आली आहे. अर्थात खड्ड्यात जमवलेले पाणी काही काळ स्थिर झाल्याने अगदी थोड्या वेळातच ते स्वच्छ दिसू (पाण्याचा तो गुणधर्मच असतो) लागते. येथे दुसरा अंक सुरु होतो. हे जमा झालेले नाल्याचे पाणी एका बादलीस (मध्यम आकाराची) रुपये ८० फक्त, या दाराने ही महिला दिवसभर विकत असते.

फिल्टर पाडा किंवा कुठल्याही झोपडपट्टीत पाणीटंचाई ही नेहमीचीच असते. हे पाणी पवईजवळील एल अँड टी चौक परिसरात असलेल्या खाऊ गल्लीतील टपऱ्या विकत घेऊन खाद्यपदार्थ बनवून विकत असतात. संतापजनक बाब म्हणजे या फिल्टर पाड्यानजीकच पवईकडे जाताना मुंबई महापालिकेच्या पाणी विभागाचे प्रमुख कार्यालय आहे. या व्हिडीओत उभी असलेली बाईक दिसत असून त्याच्यापासून पाऊलभर अंतरावरच हा पाणी साठवण्याचा खड्डा आहे. वनराई पोलीसठाणे, पवई पोलीसठाणे आणि महापालिका प्रशासन याविरुद्ध काही कारवाई करेल या आशेने नागरिक दिवस काढत आहेत. विशेष माहिती हाती आली की, फिल्टरपाड्यात काहीही घडले की कारवाई होवो. किंवा न होवो वनराई व पवई पोलीसठाणे हद्दीचा वाद जरूर निर्माण करतात व या वादानेच समाजकंटकांचे फावते असे आरे कॉलनीतील अनेक. नागरिकांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Continue reading

नव्या महापालिका आयुक्तांचे स्वागत करताना…

मुंबईच्या पहिल्या महिला महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे मुंबईकरांच्या वतीने स्वागत करताना त्यांना मुंबईतल्या गिरगावातल्या 'हौदा'कडे बोट दाखवण्याची इच्छा नव्हती. परंतु त्या मुंबईच्या मेट्रो प्रकल्पाच्या प्रमुख होत्या. आजही तो अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडेच आहे, त्यामुळे हीच संधी घेतली म्हणाना. मुंबई...

लांब जटा.. टिळा-टोपी-माळा, अशा प्रतिमेला छेद देणारा भोंदू!

कॅप्टन नसलेल्या आणि इयत्ता दहावी नापास असलेल्या अशोक खरात नामक भोंदूबाबाच्या विविध कथांनी राज्यातील वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने सध्या भरून वाहत आहेत! तसे पाहिले तर आपल्या राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला बुवाबाजींनी ग्रासलेले आहे. कुठे आसाराम आहेत तर कुठे बाबा...

सत्यमेव जयते!

अलीकडे आपल्या सार्वजनिक व खासगी बँकामधील गैरप्रकारांची अनेक प्रकरणे बाहेर आली आहेत. भविष्यात आणखीही येण्याची शक्यता आहे. आपल्याकडे अशा सर्व प्रकरणाची एक खासियत आहे की, बँकेचे संबंधित अधिकारी वा संबंधित व्यवसायिक एकदा का न्यायालयात गेले की न्यायांचे 'दळण' सुरु...
Skip to content