Homeकल्चर +सोमवारी वर्ल्ड डिजिटल...

सोमवारी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर बघा ‘बायको देता का बायको’!

ऐन तरुणाईत लग्नासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांना आज बायको मिळणं कठीण झालं आहे. पण असं का व्हावं? हा गंभीर मुद्दा आपल्या विनोदी ढंगात १८ सप्टेंबरला घेऊन येत आहे ‘बायको देता का बायको’ हा चित्रपट… ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर…

जेव्हा योग्य वय येतं तेव्हा प्रत्येकजण लग्न करण्याचा विचार करतो. कारण लग्न हा आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. ‘बायको देता का बायको’ हा चित्रपट असाच एक चित्रपट आहे जिथे पुरूषांना योग्य नोकरी नसल्यामुळे बायको शोधण्यासाठी संघर्ष करावा लागतो. सुरेश साहेबराव ठाणगे दिग्दर्शित ‘बायको देता का बायको’ या धम्माल विनोदी चित्रपटात इरसाल विनोदी अभिनेते सुनील गोडबोले, सिद्धेश्वर झाडबुके, अभिलाषा पाटील, किशोर ढमाले, श्वेता कुलकर्णी, आरती तांबे, प्रतीक पडवळ इत्यादींच्या भूमिका आहेत.

एकिकडे मुली उच्च शिक्षण घेत आयुष्यात भराऱ्या घेत आहेत तर मोठ्या संख्येने मुले शिक्षणाकडे दुर्लक्ष करून वाईट वळणावर जात आहेत. या वाईट वळणाने त्यांच्या आयुष्यालाही वाईट कलाटणी मिळते आणि तेव्हा पश्चाताप करण्याशिवाय त्यांच्याकडे काही उरत नाही. म्हणून मुलांना मुली मिळणं कठीण झालं आहे. हा गंभीर मुद्दा सर्वांपर्यंत पोहोचावा म्हणून विनोदी ढंगात बनलेला ‘बायको देता का बायको’ हा चित्रपट आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहोत, असे अल्ट्रा मिडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि.चे सी.इ.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

अधिक माहितीसाठी www.ultrajhakaas.com ला भेट द्या.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content