Homeकल्चर +'जय जय स्वामी...

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची ‘महामृत्युंजय’ लीला!

संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका रंजक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्वितीय आणि गूढ लीला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका स्वामी समर्थांच्या जीवनातील चमत्कारिक प्रसंग आणि त्यांची अध्यात्मिक लीला उलगडण्यावर आधारित आहे. मालिकेने प्रेक्षकांच्या मनात भक्ती आणि श्रद्धेचा विशेष ठसा उमटवला असून स्वामी समर्थांच्या कथांचा गूढ आणि चमत्कारिक भाग प्रेक्षकांना आकर्षित करत आहे.

या आठवड्यात तुम्ही पाहू शकता की, साक्षात महादेवाचे अंश असलेले कर्नाटकच्या मुरगोड गावचे स्वामीभक्त चिदंबर दिक्षित अक्कलकोटमध्ये येऊन एक महायज्ञ आयोजित करतात. या यज्ञादरम्यान एका विचित्र स्थितीत मरण पावलेल्या ब्राह्मणाला स्वामी समर्थ एका विलक्षण अद्भुत लीलेने जिवंत करतात. या घटनेनंतर हा महायज्ञ कसा पूर्ण होतो याची विलक्षण भक्तिमय रंजक गोष्ट. ही मालिका नित्यप्रति जास्त लोकप्रिय होत चालली आहे. स्वामी समर्थांच्या भक्तांच्या आयुष्यातील या लीला भक्तांना नवी ऊर्जा आणि अपार श्रद्धा प्राप्त करून देत आहेत.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content