राजधानी दिल्लीत २६ जानेवारीला होणारी प्रजासत्ताक दिनाची कवायत (रिपब्लिक डे परेड) तेथे उपस्थित राहून पाहणे डोळ्याचे पारणे फेडणारेच असते. संपूर्ण देशवासियांना ही संधी चालून आली आहे. शौर्य पुरस्कार पोर्टलद्वारे गैलेंट्री अँवार्ड पोर्टलच्या माध्यमातून ईनोव्हेटीव्ह ट्रिब्युट्स टू ब्रेव्हहार्टस म्हणजेच शूरवीरांना नाविन्यपूर्ण अभिवादन, या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
शौर्य पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यासाठी लोकांनी सहभागी होऊन त्यांना वैशिष्ट्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने अभिवादन करणारे प्रशस्तीपत्र पाठवावे. विजेत्याला २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाची कवायत प्रत्यक्ष हजर राहून पाहता येईल.
देशातील शौर्य पुरस्कार विजेत्यांचे अमर धैर्य आणि त्याग अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने राष्ट्राने स्मरणात ठेवणे स्पृहणीय आहे. www.gallantryawards.gov.in हे पोर्टल देशातील शौर्य पुरस्कार विजेत्यांचा सन्मान आणि स्मरण करण्यासाठी तयार आलेले भारताचे अग्रणी ऑनलाईन व्यासपीठ आहे.
गैलेंट्री एवॉर्ड पोर्टलने ‘ईनोव्हेटीव्ह ट्रीब्युटस टू ब्रेव्ह हार्टस’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. यात संपूर्ण भारतातून सहभागी होणाऱ्यांना देशातील शूरवीरांना अनुपम आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने वंदन करत प्रशस्तीपत्र देता येईल. या स्पर्धेचा उद्देश शौर्य पुरस्कार विजेत्यांना सुयोग्य पद्धतीने अभिवादन करण्यासाठी संदेशांची मालिका तयार करणे, हा आहे. ही स्पर्धा दिनांक 15 एप्रिल ते 15 मे 2021पर्यंत सुरू राहणार आहे.
स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रवेशिकांतील, कलात्मक पैलू, नाविन्य, रचना आणि सरलता पाहून तसेच त्यातून शौर्य पुरस्कार पोर्टलची दृष्टी आणि उद्दिष्टे किती उत्तम रीतीने अधोरेखित करण्यात आली आहेत, यानुसार त्यांचे परीक्षण केले जाणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना गैलेंट्री एवॉर्ड पोर्टल आणि समाज माध्यमांवरून प्रसिद्धी देण्यात येईल. तसेच विजेत्यांना 2022 साली नवी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाची कवायत पाहण्याची संधी मिळेल.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुढील वेबसाईटला भेट द्यावी.
https://www.gallantryawards.gov.in/single_challenge/event/46