नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या वतीने महिलांसाठी आजपासून एक विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे दागिने नवरात्रौत्सवातील त्या दिवसाच्या रंगावरील वेशभूषेवर ते परिधान करावयाचे आहेत.
या वेशभूषेची निवडक छायाचित्रे आपल्या नाव तसेच दूरध्वनी क्रमांकासह ८५९१२३८५८० या क्रमांकावर व्हॉट्सएप करायचे आहे किंवा #whpjnavratrichallenge वर हॅशटॅग करायचे आहे. दररोज तीन भाग्यवान विजेत्यांना गिफ्ट व्हाउचर्स मिळणार आहेत. त्याचबरोबर वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या इन्स्टा आणि फेसबुकवर झळकण्याची संधीही…
दागिने परिधान करण्याचे प्रकार दिनांकनिहाय–
११ ऑक्टोबर- पेंडन्ट
१२ ऑक्टोबर– ठुशी
१३ ऑक्टोबर– बुगडी
१४ ऑक्टोबर– नथ
१५ ऑक्टोबर– नेकलेस
अधिकाधिक महिला वर्गांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

