Homeपब्लिक फिगरविरेंद्र जाधव यांनी...

विरेंद्र जाधव यांनी घेतली मधु मंगेशांची भेट!

पद्मश्री पुरस्काराने नावाजलेले व ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना नुकताच प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार जाहीर झाला आहे. यानिमित्त त्यांचे अभिनंदन करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष विरेंद्र जाधव यांनी मुंबईतल्या अंधेरी येथील त्यांच्या  राहत्या घरी जाऊन नुकतीच सदिच्छा भेट घेतली.

कविवर्य सन्मित्र प्रसाद कुलकर्णी यांच्यामुळे हा सुंदर योग जुळून आला. मनसेच्या गोरेगाव विधानसभा महिला विभागाध्यक्ष धनश्री चिंचकर नाईक होत्या. जाधव यांच्या मधुभाईंसमवेत दोन तास मनसोक्त गप्पा रंगल्या. मराठी भाषेची सद्यस्थिती आणि तिचे भविष्य या विषयावर त्यांनी मनसेच्या या नेत्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content